शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
2
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
4
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
5
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
6
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
7
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
8
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
9
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
14
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
19
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
20
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

...अखेर त्यांना मिळणार हक्काची घरे

By admin | Published: June 13, 2016 4:03 AM

बीएसयूपी प्रकल्पातील लाभार्थ्यांचे हककाचे घर मिळण्याचे स्वप्न अखेर पूर्णत्वाला येणार आहे.

कल्याण : बीएसयूपी प्रकल्पातील लाभार्थ्यांचे हककाचे घर मिळण्याचे स्वप्न अखेर पूर्णत्वाला येणार आहे. या योजनेंतर्गत येथील कचोरे आणि इंदिरानगर येथे बांधलेल्या १ हजार ४१२ सदनिकांचे वाटप कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने मंगळवार १४ आणि बुधवार १५ जून रोजी करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांना पैसे देण्याबाबतचे पत्र मिळाले आहे व ज्यांनी पैसे भरलेले आहेत. अशांना या सदनिका मिळणार आहेत. ही प्रक्रिया सकाळी ११ वाजता आचार्य प्र.के. अत्रे रंगमंदिरात होईल.कचोरे येथील १०८२ आणि कल्याणच्या इंदिरानगरमधील ३३० अशा एकूण १ हजार ४१२ सदनिकांचे वाटप करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उर्वरित ६ हजार २९५ सदनिकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ज्या सदनिका तयार आहेत, त्या लाभार्थ्यांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम जारी करण्यात आला आहे.संबंधित लाभार्थ्यांनी मूळ कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केडीएमसीने लाभार्थ्यांना पैसे देण्याबाबत दिलेली पावती आणि लाभार्थ्यांनी पैसे भरल्यानंतर दिलेली अशा दोन्ही पावत्यांची छायांकित प्रतही बंधनकारक करण्यात आली असून त्यानंतरच आचार्य अत्रे रंगमंदिरात प्रवेश दिला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)