शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

वित्तमंत्र्यांच्या कार्यालयाला आयएसओ मानांकन!

By admin | Published: June 30, 2017 1:15 AM

कामाच्या तक्रारी घेऊन राज्यभरातून मंत्री कार्यालयासमोर गर्दी करणारे नागरिक आणि त्यांच्याकडे तुच्छतेने पहात, टोलवाटोलवी

अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कामाच्या तक्रारी घेऊन राज्यभरातून मंत्री कार्यालयासमोर गर्दी करणारे नागरिक आणि त्यांच्याकडे तुच्छतेने पहात, टोलवाटोलवी करणारे मंत्र्यांच्या कार्यालयातले कर्मचारी हे चित्र मंत्रालयाला नवे नाही. मात्र याला छेद देत गुरुवारी मंत्री कार्यालयाची प्रतिमा बदलणाऱ्या तीन आश्चर्यकारक गोष्टी घडल्या. वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला आय.एस.ओ. मानांकन मिळाले, असे मानांकन मिळविणारे हे देशातले पहिले मंत्री कार्यालय ठरले आहे.शासकीय कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस खादी वापरली पाहिजे, या आदेशाची अंमलबजावणी करणारे म्हणूनही वित्त मंत्र्यांचे कार्यालय देशातले पहिले कार्यालय ठरले. मुनगंटीवार यांच्या कार्यालयातले सगळे अधिकारी, कर्मचारी खादीचा एकच गणवेश घालून होते. तिसरी गोष्ट घडली ती राजशिष्टाचाराचे सगळे संकेत बाजूला सारून राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्री स्वत: वित्तमंत्र्यांच्या दालनात गेले व मुनगंटीवार यांच्यासह त्यांच्या कार्यालयीन सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांचे कौतुकही केले. एखाद्या लग्नघरासारखे मंत्री कार्यालय सजले होते. सगळे कर्मचारी, अधिकारी एकाच रंगाचे खादीचे जॅकेट घालून आले होते. ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडणाऱ्या वनमंत्र्यांच्या कार्यालयातील सगळ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी ‘ग्रीन आर्मी’ योजनेत स्वत:ची नोंदणी करून घेतली आणि आयएसओ प्रमाणपत्र मिळवले. हे तीनही कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुनगंटीवार यांच्या कार्यालयात पार पडले.आयएसओ मानांकन का घेतले, याची अत्यंत सुरस माहिती यावेळी वित्तमंत्र्यांनी सांगितली. वन विभागाला आधी ९९ व नंतर ३३ असे एकून १३२ पथदर्शी मुद्दे ५ वर्षांकरीता देण्यात आले. यामध्ये ‘प्रशासकीय सुधारणा’ या एकाच मुद्दाच्या अनुषंगाने वन विभागाच्या सर्व कार्यालयांना आयएसओ मानांकन घेण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले. हे उद्दीष्ट क्षेत्रीय कार्यालयापुरते मर्यादित असताना इतरांनाही प्रेरणादायी ठरावे म्हणून मंत्री कार्यालय सुद्धा आयएसओ प्रमाणित करण्याचे ठरवले गेले आणि ते प्रमाणपत्रही आम्ही मिळवले, असे त्यांनी यावेळी सांगितले.बांबूपासून तयार करण्यात आलेली तलवार, वनौषधी संदर्भातील माहिती पुस्तिका व रोप देऊन सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार, वनविभागाचे सचिव विकास खारगे, आयएसओ यंत्रणेचे प्रमुख शशिनाथ मिश्रा, नरेंद्र गंगाखेडकर, माजी आमदार अतुल शहा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. वित्तमंत्र्यांच्या कार्यालयात कोणतेही पत्र द्या किंवा मंत्र्यांना मेसेज करा, त्याचाही पाठपुरावा केला जातो आणि त्याची नोंद आढळते असे यावेळी कार्यालयातील विशेष कार्यअधिकारी महेश शेवाळे यांनी सांगितले. त्यांनीच या कार्यक्रमाचे संचलनही केले.