मुंबई : जात वैधता प्रमाणपत्र देताना कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे. जात वैधता प्रमाणपत्र कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मुगणेकर म्हणाले की, जातीचे प्रमाणपत्र मिळवताना सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारावरच जात वैधता प्रमाणपत्र मिळत आहे. सरकारने वैधता तपासण्याची सक्ती केल्याने कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे हा कायदा तत्काळ रद्द करावा. शिवाय खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मागासवर्गीयांच्या निधीत केलेल्या कपातीवरही त्यांनी आक्षेप नोंदवला. २०१५-१६ वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ जयंती असल्याने हे वर्ष समता अभियान वर्ष अभियान म्हणून साजरे करणार असल्याचे मुणगेकर यांनी सांगितले. डॉ. आंबेडकर सामाजिक आणि आर्थिक प्रवर्तन संस्थेमार्फत रवींद्र नाट्य मंदिरात अभियानाची सुरूवात करण्यात येईल. यावेळी ‘भारतीय लोकशाहीसोमरील आव्हाने’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले असून निवृत्त न्यायाधीश पी.बी.सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. (प्रतिनिधी)
जात वैधता प्रमाणपत्रातून आर्थिक शोषण
By admin | Published: April 04, 2015 4:24 AM