मुंबई : देशाची आर्थिक नाडी कामगारांच्या हाती असल्याने त्यांच्या गुणगौरव सोहळ्याला तांत्रिक अडचण येता कामा नये, असे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांनी केले. २०१५-१६चा गुणवंत कामगार पुरस्कार सोहळा वेळेत घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.एलफिन्स्टन कामगार मैदानात कामगार कल्याण मंडळाच्या ३२व्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार सोहळ्यात विजय देशमुख कामगारांशी बोलत होते. कल्याण आयुक्त सुरेखा जाधव, मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गावित उपस्थित होते.२०१४-१५ सालच्या कामगार भूषण पुरस्काराने रामचंद्र अर्जुन शिंदे यांना या वेळी सन्मानित करण्यात आले. २५ हजारांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेला हा पुरस्कार शिंदे यांनी सपत्नीक स्वीकाराला. कामगार भूषण रामचंद्र शिंदे हे नाशिक एकलहरे येथील औष्णिक विद्युत केंद्रात तंत्रज्ञ-३ पदावर कार्यरत आहेत. ‘श्रमकल्याण युग’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)>दिरंगाई झाली हे कबूलतांत्रिक अडचणीमुळे पुरस्कार वितरण सोहळ्याला दिरंगाई झाली हे कबूल आहे. येत्या आठ दिवसांत यंदाच्या पुरस्कार निवडीसाठी तातडीची बैठक घेण्यात येईल.- राजेंद्र गावित, अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
कामगारांकडे आर्थिक नाडी
By admin | Published: April 29, 2016 3:13 AM