शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची

By admin | Published: January 19, 2015 12:59 AM

व्यक्तिमत्त्व व देशाच्या विकासासाठी ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. गुंतवणूकदारात जागृती निर्माण व्हावी

मुख्यमंत्री फडणवीस : इंडिया बूम्स सेन्सेक्स झूम्सचे उद्घाटननागपूर : व्यक्तिमत्त्व व देशाच्या विकासासाठी ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. गुंतवणूकदारात जागृती निर्माण व्हावी यासाठी चिटणवीस सेंटर येथे आयोजित इंडिया बूम्स सेन्सेक्स झूम्स कार्यक्रमात ते बोलत होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेन्ज, एल अ‍ॅन्ड टी म्युच्यअल फंड आणि मनी बी इन्स्टिट्यूट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, बीएसई चे एमडी आशीषकुमार चव्हाण, सीडीएसएलचे पी.एस.रेड्डी, मनी बी च्या संचालक शिवानी दाणी, एल अ‍ॅन्ड टी चे यशवंत देवस्थळी कैलास कु लकर्णी आदी उपस्थित होते.लोकांना बँका व आर्थिक क्षेत्राचे ज्ञान असल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही. देशातील तरुणाईचा विकासासाठी उपयोग करावयाचा असेल तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे. आर्थिक गुंतवणूक कुठे व कशी करावी, गुंतवणूक केल्यानंतर परतावा मिळण्याची हमी आहे का, याची खात्री असायला हवी. दुप्पट-तिप्पट व्याज देणारा पैसा आणणार कोठून याचाही गुंतवणूकदारांनी विचार करायला हवा. १९९० व्या दशकात संगणक ज्ञान महत्त्वाचे होते. आता आपण इंटरनेट वापरायला लागलो आहे. २१ वे शतक हे आर्थिक साक्षरतेचे असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ९० टक्के बँका व वित्तीय संस्था मुंंबई, ठाणे, पुणे व पश्चिम महाराष्ट्रात आहेत. याच भागात बचत असून कर्ज वाटप केले जाते. अर्थातच उद्योगही याच भागात आहेत. विदर्भ व मराठवाड्यात हे प्रमाण ३.५ टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेची घोषणा केली. या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील १३ कोटी लोकांनी बँकेत खाते उघडले. यातून ४० कोटी भारतीय बँकिंग क्षेत्राशी जोडले. लोकांचा आर्थिक क्षेत्रात सहभाग असल्याशिवाय विकास शक्य नाही या प्रकल्पाला राज्य सरकारकडून मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिवानी दाणी यांनी मनी बी इन्स्टिट्यूटच्या कार्याची माहिती देऊ न सुरक्षित गुंतवणुकीचे आवाहन केले. यावेळी पी.एस.रेड्डी, वाय. एम.देवस्थळी यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)१० हजार युवकांना प्रशिक्षणविदर्भातील १० हजार युवकांना बीएसईच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार असल्याची घोषणा आशीष कुमार चव्हाण यांनी केली. नागपुरात स्टॉक एक्सचेन्ज संदर्भात तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात येईल. तसेच लघु व मध्यम उद्योगांना बीएसईकडे नोंदणी करता यावी यासाठी शिबिर आयोजित केले जातील,अशी माहिती त्यांनी दिली.प्रकल्पाला मनपाची मदतरिटेल क्षेत्रात चांगली गुंतवणूक व्हावी, या हेतूने इंडिया बूम्स सेन्सेक्स झूम्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शहराला लाभ होणार असल्याने या उपक्रमाला महापालिकेकडून सहकार्य करण्याची ग्वाही प्रवीण दटके यांनी यावेळी दिली.