शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बोटांच्या ठशांवरून घरबसल्या करता येणार आर्थिक व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 7:00 AM

एटीएम, क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड शिवाय केवळ बोटांच्या ठशांचा वापर करून बँकेशी निगडीत आर्थिक व्यवहार करता येणे शक्य होणार आहे.

ठळक मुद्देडॉ. आदित्य अभ्यंकर यांचे बायोमेट्रिक क्षेत्रात संशोधन 

राहुल शिंदे-  पुणे:  एटीएम, क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड शिवाय केवळ बोटांच्या ठशांचा वापर करून बँकेशी निगडीत आर्थिक व्यवहार करता येईल,असे सर्व आयटी  दृष्ट्या सक्षम व हॅक न करता येणारे आधुनिक बायोमेट्रिक उपकरण सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने तयार केले आहे.या उपकरणाच्या माध्यमातून ग्राहकांना पुढील काळात बोटाचे ठसे देवून घर बसल्याही आर्थिक व्यवहार करता येणे शक्य होणार आहे. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने बायेमेट्रिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधन केले असून तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम बायोमेट्रिक उपकरण तयार केले आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करण्यासाठी आता केवळ हाताच्या बोटांचे ठसे पुरेसे ठरणार आहेत. याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.आदित्य अभ्यंकर म्हणाले,विभागाने तयार केलेले उपकरण हे आधार सर्व्हरशी जोडण्यात आले आहे. आधारच्या सर्व्हरवरून संबंधित व्यक्तीच्या बोटाचे ठसे जुळत असल्याचा संदेश उपकरणावर आल्यानंतर आर्थिक व्यवहाराची प्रक्रिया सुरू होते. प्लास्टिक,जिलेटिन किंवा डेंटल मटेलिअर पासून तयार केलेल्या कोणत्याही कृत्रिम हाताच्या बोटांच्या ठशांचा वापर करून हे उपकरण हॅक करता येणार नाही.याबाबतची तंत्रज्ञान विभागाने काळजी घेतली आहे    अभ्यंकर म्हणाले,या उपकरणाकडून बोटांमधील जिवंतपणा (लाईव्हनेस)तपासला जातो.त्यामुळे कोणत्याही कृत्रिक बोटांच्या ठशांचा वापर करून आर्थिक व्यवहार करणे कोणालाही शक्य होणार नाही.आधार सर्व्हरने ठसे तपासून दिल्यानंतर बॅकेचे काही प्रोटोकॉल ग्राहकांना पूर्ण करावे लागतील.त्यानंतर कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना पैसे काढता येतील,अशा प्रकारची सुविधा देणारे आधुनिक उपकरण विद्यापीठाने तयार केले आहे.     सध्या स्टेट बँक आॅफ इंडियाने बायोमेट्रिक उपकरण ग्राहकांना उपलब्ध करून देण्याबाबत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी बँकेने विद्यापीठाकडून काही उपकरणे तपासणीसाठी घेतले आहेत. या उपकरणांवर थंड व उष्ण वातावरणात चाचणी घेण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या उपकरण किती सक्षम आहे. हे सुद्धा बँकेकडून विविध स्तरावरून तपासले जात आहे. बँकेने बायोमेट्रिक उपकरण घेण्यास प्राथमिक तयारी दर्शविली आहे.परंतु,किती उपकरणे खरेदी करणार याबाबतची कल्पना दिलेली नाही.मात्र,विद्यापीठ किती उपकरणे व कोणत्या कंपनीच्या सहकायार्तून तयार करून दिली जाणार आहेत,याबाबतची माहिती विद्यापीठातर्फे बँकेला नुकतीच कळविण्यात आली आहे,असेही अभ्यंकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठEconomyअर्थव्यवस्थाMONEYपैसाatmएटीएम