फुरसुंगी : ‘‘फुरसुंगी, उरुळी देवाची कचरा डेपोबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास कचरा डेपोवर तीव्र आंदोलन करण्यात येईल; तसेच या आंदोलनात मीही सहभागी होईन,’’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.कचरा डेपोवरील कॅपिंंगची पाहणी बुधवारी सुळे यांनी केली. काही महिन्यांपूर्वी येथील ग्रामस्थांनी आंदोलन केले होते, त्या वेळी पालिकेने प्रश्न न सोडविल्याास आंदोलनात सहभागी होण्याचे सुळे यांनी सांगितले होते. सुळे यांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांची गुरुवारी बैठक होणार आहे. तीत तोडगा न निघाल्यास मी स्वत: डेपोवर येऊन आंदोलनात सहभागी होणार आहे. पालकमंत्र्यांनी कचऱ्याचा प्रश्न सोडवावा. आम्ही सहकार्य करू. या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंंदर कामठे, महापौर दत्तात्रय धनकवडे, भगवान भाडळे, संजय हरपळे, तात्या भाडळे, राहुल चोरघडे, नीता भाडळे, विजय भाडळे, रणजित रासकर, विशाल हरपळे आदी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्यापूर्वी कचरा डेपोची पाहणी करून ग्रामस्थांची चर्चा करावी, असे आवाहन फुरसुंगी-उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी केले आहे. (वार्ताहर)४कॅपिंंग सुरू असताना २० टक्केपरिसरावर कॅपिंंग करण्यात आले नव्हते. त्याचा फायदा हंजर बंद पडल्यामुळे कचरा टाकण्यास झाला. त्या कचऱ्यामुळे कॅपिंंगचे डिझाईन बदलले जाणार आहे. मागील आंदोलनानंतर पालिकेने कचरा डेपोवर ओपन डंपिंंग करण्यास सुरुवात केली. केवळ प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न न करता ओपन डंपिंंग करून वेळकाढूपणा केला आहे, असे या वेळी नागरिकांनी सांगितले.