नाशिक : केबीसी मल्टिट्रेड रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण व आरती चव्हाण यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असून, चव्हाणच्या बँकेतील लॉकरच्या चाव्याच सापडेना, अशी स्थिती झाली आहे.बँकांसोबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मंगळवारी लॉकर उघडणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ लॉकरमध्ये किती सोने सापडते याकडे गुंतवणकदारांचे लक्ष लागले आहे़भाऊसाहेब व आरती चव्हाण हे पोलीस कोठडीत आहेत. चौकशीत चव्हाणने तीन बँकांमध्ये लॉकर व प्लॉट असल्याची माहिती दिली होती़ लॉकरमध्ये आठ ते दहा किलो सोन्याचे दागिने असावेत, असे सहायक पोलीस आयुक्तसचिन गोरे यांनी सांगितले़घोटाळ््याची मोठी व्याप्ती असल्याने पोलिसांनी एका सनदी लेखापालाचीही (सीए) नेमणूक केली आहे़ घोटाळ््यामध्ये एजंटांचीही भूमिका महत्त्वाची आहे. गुंतवणूकदारांचे पैसे काहींनी कंपनीकडे भरले नसल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. दरम्यान, केबीसीची मालमत्ता व गुंतवणूकदारांना पैसा परत देण्यासाठी न्यायालयामार्फत मैत्रेयसारखा तोडगा निघण्याची आशा चव्हाणला असल्याचे सूत्रांनी सांगितले़(प्रतिनिधी)
सूत्रधाराच्या लॉकरच्या चाव्या सापडेना
By admin | Published: May 10, 2016 3:06 AM