शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बॉटूलिझम विषबाधेवर उपाय सापडेना

By admin | Published: February 09, 2016 2:12 AM

साकडबाव पठारावर शेतीउपयोगी ३० जनावरे बॉटूलिझम विषबाधेने मृत पावल्याने शेतकरी चिंतेत असून त्यांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. या विषबाधेवर रामबाण उपाय सापडत नसल्याने

- रवींद्र सोनावळे , शेणवासाकडबाव पठारावर शेतीउपयोगी ३० जनावरे बॉटूलिझम विषबाधेने मृत पावल्याने शेतकरी चिंतेत असून त्यांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. या विषबाधेवर रामबाण उपाय सापडत नसल्याने पशुधन अधिकारी हताश झाले आहेत.शहापूर तालुक्यातील साकडबाव पठारावर सलग तिसऱ्या वर्षी बॉटूलिझम विषबाधेने थैमान घातले आहे. जनावरांमध्ये क्षरांची कमतरता, पुरेसा खुराक नसणे, मयत जनावरे उघड्यावर टाकणे, कुजलेल्या हाडातील व पालापाचोळ्यातील बॉटूलिझम विष मोकाट जनावरांनी खाणे, कुजलेले आंबे खाणे, पुरेसे पोटभर पाणी न मिळणे, ही या विषबाधेची मूळ कारणे असून गुरांचे पायबळ जाणे, ताकद कमी होणे, शेपटी लुळी पडणे, चालता न येणे, उठता न येणे, भूक मंदावणे, लाळ सांडणे, अंग गार पडणे, पाय व शेपटीला सुई टोचल्यास वेदना न होणे, ही विषबाधेची लक्षणे आहेत. या विषबाधेने २०१३-१४ मध्ये चिलरवाडीतील ८८ जनावरे मृत पावली होती. संबंधित शेतकऱ्यांना आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत न्युकलियास बजेटमधून बैल- सात हजार, गाय- पाच हजार व वासरू- दोन हजार याप्रमाणे अर्थसाहाय्य केले होते. तसेच २०१४-१५ साली चिंद्याचीवाडी येथील ४० जनावरे मृत पावली आहेत. त्यांना अजूनही भरपाई मिळाली नसून १५ डिसेंबर २०१५ ते ७ फेब्रुवारी २०१६ या दोन महिन्यांत लाख्याचीवाडी, मधलीवाडी व रानविहीर येथील यशवंत लाखे ९, विठ्ठल लाखे ५, मंगल भामरे ४, संजय भारमर १, मनोहर लाखे १ , नवसू भगत २, सुभाष शिरकंडे २, तुकाराम बरतड १, विठ्ठल मुंढे १, हिरामण लाखे २, जयराम मेंगाल १, शंकर भगत १ या १२ आदिवासी शेतकऱ्यांची ३० जनावरे मृत पावली आहेत. यातील १६ जनावरांचे पोस्टमार्टम करून त्यांचे नमुने चौकशीसाठी पुणे येथील पशुरोग अन्वेषण विभागाकडे पाठविले आहेत. या प्रकारच्या विषबाधेवर कोणतीही लस अथवा औषधोपचार उपलब्ध नसल्याने उपचाराविना लागण झालेली जनावरे १२ तासांच्या आत मृत पावतात. - डॉ .ए.पी. पाटील, पशुधन विकास अधिकारी, पं.स. शहापूर