शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

देखण्या चेह-यासाठी फिलर्सचा ट्रेंड, प्लास्टिक सर्जन, स्कीन स्पेशालिस्टची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 3:13 AM

नवरात्रीत चेहरा सुंदर, उजळ, टवटवीत दिसावा, यासाठी सध्या पार्लर्समध्ये जशी गरबाप्रेमींची गर्दी होते आहे, तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्त गर्दी प्लास्टिक सर्जन आणि स्किन स्पेशालिस्टकडेही होते आहे.

प्रज्ञा म्हात्रे।ठाणे : नवरात्रीत चेहरा सुंदर, उजळ, टवटवीत दिसावा, यासाठी सध्या पार्लर्समध्ये जशी गरबाप्रेमींची गर्दी होते आहे, तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्त गर्दी प्लास्टिक सर्जन आणि स्किन स्पेशालिस्टकडेही होते आहे. यंदाच्या नवरात्रीपूर्वी त्वचेचे फिलर्स करुन घेण्याचा ट्रेण्ड दिसून येत आहे. फिलर्स ही त्वचेवरील प्रक्रिया आहे आणि चेहरा आकर्षक दिसावा, यासाठी त्याकडे गरबाप्रेमी जास्त वळत असल्याचे प्लास्टिक सर्जननी सांगितले.नवरात्रीत तरुणाई गरबा खेळण्यासाठी तरूणाईची सर्वाधिक गर्दी होते. हा गरबा हौैसे-मौजेपुरता मर्यादित राहिला नसून त्याला कॉर्पोरेट इव्हेण्टचे स्वरुप आले आहे. त्यामुळे दिलखेचक नृत्यासोबतच लूक, उत्तम वेशभूषा, केशभूषेपर्यंत अनेक स्पर्धा घेतल्या जातात. गरब्यात आपण ‘सेंटर आॅफ अ‍ॅट्रॅक्शन’ असावे, असे प्रत्येकाला वाटते. यासाठी महिनाभर आधीपासूनच तयारी सुरू होते. जसजसे दिवस जवळ येतात तसतशी ही तयारी जोर धरु लागते. यात पेहराव असो किंवा मेकअप साºयासाºयाचीच तयारी तरुणाई करते. जसा ट्रेण्ड तसा लूक करण्याकडे कल असतो. त्यामुळे पार्लर्सकडे पावले वळत आहेत. यात तरुणी आघाडीवर आहेत.पाल्ररसोबत यंदा गरबाप्रेमींत फिलर्स करुन घेण्याचा ट्रेंड असल्याचे प्लास्टिक सर्जन समीर कारखानीस यांनी सांगितले. ओठांचा आकार हवा तसा करून घेणे, गालांचा उठाव, डोळ््यांच्या खालचा भाग सुरकुत्यारहीत करणे-त्याचा काळेपणा घालवणे, नाकाची ठेवण, चेहरा-खास करून हुनवटीची ठेवण बदलणे यासाठी हे फिलर्स केले जातात. यात ओठ आणि चेहºयाचे फिलर्सकरुन घेण्याला तरुणींची जास्त पसंती आहे. तरुण मुलेही फिलर्स करतात. जॉ लाईन (हनुवटीचा निमुळता भाग) वाढविण्याकडे तरुणांचा कल असतो, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.फिलर्स ही त्वचेची प्रक्रिया आहे. इंजेक्शनच्या साहाय्याने हे फिलर्स केले जातात. या फिलर्सचा इफेक्ट सहा महिने राहतो. फिलर्स करुन घेण्याची प्रक्रिया महागडी आहे. पण तरीही त्वचेबाबत जागरूक असणारी तरुणाई या महागड्या प्रक्रिया करुन घेण्यास पसंती देते. फिलर्स ही सर्जरी नाही. त्यामुळे त्यासाठी फार तयारीची गरज लागत नाही. आठवडाभरआधी फिलर्स केले की नवरात्रीपर्यंत त्याचा हवा तसा इफेक्ट येतो. फिलर्सच्या प्रक्रियेला पाच ते दहा मिनिटे लागतात. एका भागाच्या एका इंजेक्शनसाठी २२ ते २५ हजारांचा खर्च येतो, अशी माहिती कारखानीस यांनी दिली. फिलर्स करुन घेण्याचे प्रमाण ८० टक्के तरुणींत आणि २० टक्के तरूणांत असल्याचे त्यांनी सांगितले. फिलर्ससोबतच लेझरच्या साह्याने अनावश्यक केस काढण्याच्या - हेअर रिमुव्हल प्रक्रियेकडेही तरुणाई वळते आहे. यातही तरूणी आघाडीवर आहेत. ज्यांना बॅकलेस चोळी घालायची आहे, त्या तरुणी पाठीवर ही प्रक्रिया करुन घेतात. तसेच, चेहºयावरही ज्यांना अनावश्यक केस नको आहेत, ते तेथे ही प्रक्रिया करुन घेतात. तिला साधारण १० सिटींग लागतात. दोन सिटींगमध्ये दीड ते दोन महिन्यांचे अंतर ठेवावे लागते. त्यामुळे यासाठीसहा महिनेआधीच तरुणी तयारी करतात. नवरात्र आले की फक्त फायनल टच अप देतात, असा तपशील त्यांनी दिला.>डाग, खड्डे काढण्यावर ट्रिटमेंटमध्ये भरचेहºयावरील डाग, खड्डे काढण्यासाठी, चेहºयावर तजेला-उजळपणा आणण्यासाठी, त्वचा नितळ करण्यासाठी लेझर फेशियल, केमिकल पिलिंग, मायक्रो डर्मा प्रेजन या त्वचा उपचारांकडेही तरुणाई मोठ्या प्रमाणात वळते. हे उपचार तुलनेने स्वस्त असल्याने याचाही जास्त ट्रेण्ड असल्याचे कारखानीस म्हणाले.>इंटरनेटमुळे जागरूकतात्वचेच्या प्रक्रियेसाठी ही तरुणाई सेलिब्रेटीला कॉपी करतेच. परंतु आता इंटरनेटवरही याची माहिती उपलब्ध असल्याने त्यांच्यात जागरूकता आली आहे. परंतु या प्रक्रियेसाठी क्वालिफाईड प्लास्टिक सर्जनकडेच जावे,असे त्यांनी सुचवले.