ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ३० - भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या विरोधात बीडच्या शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पंचायत समिती सदस्य रामकृष्ण घुलेंच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. मी महंत नामदेव शास्त्री यांच्या दर्शनासाठी गेलो होते त्यावेळी तिथे जमलेल्या जमावाने मला बेदम मारहाण केली असा आरोप रामकृष्ण घुले यांनी केला.
बेकायद जमाव जमवून धक्काबुक्की केल्याचा गुन्हा नामदेव शास्त्री यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरुन नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वाद सुरु आहे. भगवान गडावर यंदाच्या दसरा मेळाव्याला राजकीय भाषण होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका नामदेव शास्त्री यांनी घेतली आहे.
त्यामुळे दस-यापर्यंत हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. गडावर दसरा मेळाव्याचे भाषण होऊ द्या अशी विनंती आपण नामदेव शास्त्री यांना केली पण त्यांनी रिव्हॉलव्हर असती तर गोळया घालून तुला मारले असते अशी धमकी त्यांनी दिली असे रामकृष्ण घुलेंनी आरोप केला आहे.