ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. १८ : दहिवडी येथील बाजार पटांगणात असलेल्या फटाक्याच्या दुकानाला सोमवारी रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली. यामुळे परिसरातील सुमारे बारा दुकानाने जळून ख़ाक झाली. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनास्थळी हजारो ग्रामस्थांनी धाव घेतली. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यात अनंत अडचणी येत होत्या. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. म्हसवड पालिकेचा अग्निशमन बंब मागविण्यात आला; मात्र एक तासानंतर तो आला. तोपर्यंत शेखर गोरे प्रतिष्ठानचे दोन टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
कानठळ्या बसविणारे स्फोटया परिसरातील काही दुकानांमध्ये गॅस सिलिंडर असण्याची शक्यता असून, सिलिंडरच्या स्फोटांचा आवाजाने कानठळ्या बसत होत्या. दहिवडीच्या भरचौकात याप्रकारची आग प्रथमच लागली होती.फटाक्याच्या दुकानाला सर्वप्रथम आग लागली. त्यानंतर या आगीने बॉम्बे जनरल स्टोअर्स, शिवशक्ती जनरल स्टोअर्स, आतार बेकरी, बागल झेरॉक्स, पवार रसवंती गृह व भांडी केंद्र, शू-मार्ट, श्रीराम झेरॉक्स सेंटर, देशमाने मोटार, अमोल जनरल स्टोअर्सचे या दुकानांना वेढले.