शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

रेल्वेने अग्निशमन विभागच केला बंद

By admin | Published: November 07, 2014 12:43 AM

भारतीय रेल्वेत आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिशकाळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग तयार केला गेला होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

धोक्याची बाब : कशी होईल प्रवाशांची सुरक्षा?नागपूर : भारतीय रेल्वेत आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिशकाळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग तयार केला गेला होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्याचे धक्कादायक वास्तव आहे. चक्क अग्निशमन विभागच हरविल्याने रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागात आग लागल्यास ती विझविणार कोण? हा गंभीर प्रश्न असून यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या चालू तिकीट कार्यालयाला आग लागून मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानीची घटना घडली नाही. भारतीय रेल्वेत इंग्रजांच्या काळापासून रेल्वेत लागलेल्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र अग्निशमन विभाग अस्तित्वात होता. हा विभाग सुरक्षा विभागांतर्गत कार्यरत होता. सुरक्षा आयुक्त दर्जाचा अधिकारी या विभागाचा प्रमुख होता. या विभागाचे कामकाजही स्वतंत्र असायचे. आगीची सूचना मिळताच या विभागाची रेल्वेगाडी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी पोहोचायची. मात्र, १९९६ साली या अग्निशमन विभागाचे रेल्वे सुरक्षा दलात विलिनीकरण करण्यात आले. तेव्हापासून आगीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी रेल्वेत स्वतंत्र विभागच अस्तित्वात नाही. देशात सर्वाधिक प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे एखाद्या प्रसंगी मोठी आग लागल्यास मोठा पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धावत्या रेल्वेगाडीतही आगीवर नियंत्रण मिळविण्याची कुठलीच यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे आग लागल्यास नजीकच्या अग्निशमन विभागावर अवलंबून राहण्याची पाळी रेल्वेवर येते. एखाद्या वेळी मदत मिळण्यास उशीर झाल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण होते. (प्रतिनिधी)अख्खे रेल्वेस्थानक खाक होण्याची भीतीनागपूर रेल्वेस्थानकावर अनेकदा पेट्रोलने भरलेल्या बंबाच्या मालगाड्या उभ्या राहतात. एखाद्या प्रसंगी शॉट सर्किटमुळे आग लागल्यास आणि या पेट्रोलच्या मोठमोठ्या बंबांनी पेट घेतल्यास अख्खे रेल्वेस्थानकच जळून खाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेट्रोलच्या बंबासह अनेकदा दगडी कोळशाने भरलेल्या मालगाड्याही रेल्वेस्थानकावर उभ्या राहतात. त्यामुळे आग लागल्यास प्लॅटफॉर्मवर आग विझविण्यासाठी कुठलेच उपकरण नसल्याने मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध विभागात लावलेली अग्निशमन उपकरणे प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्याची गरज आहे.कर्मचाऱ्यांना हाताळता येत नाहीत उपकरणमध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील काही कार्यालयात रेल्वेने अग्निशमन उपकरणे लावली आहेत. परंतु, कर्मचाऱ्यांना ही उपकरणेच कशी हाताळावी याचे ज्ञान नसल्यामुळे आग लागल्यास आणि अग्निशमन उपकरण असूनही त्याचा काहीच लाभ न होण्याची शक्यता आहे. माजी महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी नागपूरचा दौरा केला असताना त्यांनी बेस किचनला भेट दिली. तेथे स्वयंपाक तयार करणाऱ्या एका कामगाराला त्यांनी अग्निशमन उपकरण हाताळून दाखविण्याची मागणी केली. मात्र आपल्याला ते कसे हाताळावे याची माहिती नसल्याचे या कामगाराने सांगितल्यानंतर ते चांगलेच संतापले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अग्निशमन उपकरण हाताळण्याचे प्रशिक्षण देणेही तेवढेच गरजेचे आहे.