ऑनलाइन लोकमत
सटाणा, दि. २८ - सटाणा तालुक्यातील वटार येथे झापास आग लागून अंदाजे ३० ते ४० हजार रुपयाच्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. येथील शेतमजूर निबां किसन माळी हे सर्व लग्नासाठी गेल्याने घराला आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी माणुसकी दाखवत पूर्व प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग इतकी भयानक होती की सर्व जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रशांत बागुल, उपसरपंच पोपट खैरनार यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत प्रत्यक्ष घटनेची पाहणी केली. त्यानंतर तलाठी मेधणे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व रीतसर पंचनामा करून घेतला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सरपंच प्रशांत बागुल, उपसरपंच पोपट खैरनार, अनिल पाटील, माझी सरपंच रामदास खैरनार, मनोज बागुल, बाजीराव खैरनार, संतोष बागुल, चेतन गांगुर्डे, त्रंबक गांगुर्डे, रामदास जाधव, रामकृष्ण खैरनार, हरी बापू खैरनार, ग्रामसेवक एस. व्ही. काकळीज, फकीरा खैरनार, हरिष खैरनार, हरिभाऊ खैरनार, दशरथ खैरनार आदींसह मोठया संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.