शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

मुंबई-पुणे जुन्या एक्स्प्रेस वे वर पेट्रोल टँकरला आग; वाहतुकीचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2017 11:51 AM

पुणे, दि. 6 - मुंबई-पुणे जुन्या एक्स्प्रेस वेवर एका पेट्रोलच्या टँकरला अपघात झाल्यानंतर तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यामुळे काही ...

पुणे, दि. 6 - मुंबई-पुणे जुन्या एक्स्प्रेस वेवर एका पेट्रोलच्या टँकरला अपघात झाल्यानंतर तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यामुळे काही वेळासाठी या मार्गावरची वाहतूक बंद केली होती. मात्र हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येत असून, वाहन चालकांना प्रचंड कोंडी सहन करावी लागतेय. रसायनी जवळच्या भोकरपाडा येथे सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा पेट्रोलच्या टँकला अपघात झाला. त्यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.वाहतुकीच्या खोळंब्यामुळे या मार्गावरची वाहतूक सावलामार्गे वळवली. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव अनेकदा अपघात घडतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगातील इनोव्हा कार क्र. (टऌ 23 अङ 3888) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली उतरुन तब्बल 3झाडांना धडकून नाल्यामध्ये कोसळली होती. या अपघातात 1 जण जागीच ठार तर 3 जण जखमी झाले होते.अपघातात सांदीपान भगवान शिंदे वय 60 वर्षे रा.बीड) यांचा मृत्यू झाला होता, सुभाष साहेबराव जगताप (वय ७० वर्षे), किसन जठार (वय 71 वर्ष), मुक्ताराम किसन तावरे (वय 71 वर्षे सर्व राहणार धानेगल्ली, बीड) हे जखमी झाले होते. जखमीना निगडी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्याजवळील वलवण व कुणेगाव पूलांसह दस्तुरी गावच्या हद्दीत अनेक ठिकाणी पावसामुळे मोठमोठे खड्डे पडून मार्गाची चाळण झाल्याने जलद व सुरक्षित प्रवासासाठी संबोधला जाणारा मार्ग सध्या असुरक्षित बनला असून, अपघातांना निमंत्रण देणारा ठरला आहे. यामुळे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खड्ड्यांमुळे धोकादायक झालेल्या परिसरात आपल्या वाहनांच्या वेगावर अंकुश ठेवून, सुरक्षित प्रवास करावा.