शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सदोष वायरिंगमुळे लागली आग

By admin | Published: February 25, 2016 3:03 AM

सदोष वायरिंगमुळे गिरगाव चौपाटी येथे आयोजित ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात आगीचा भडका उडाला. त्यात १५ गॅस सिलिंडर व अन्य ज्वलनशील वस्तूंचा साठा स्टेजखाली

मुंबई: सदोष वायरिंगमुळे गिरगाव चौपाटी येथे आयोजित ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात आगीचा भडका उडाला. त्यात १५ गॅस सिलिंडर व अन्य ज्वलनशील वस्तूंचा साठा स्टेजखाली असल्याने ही आग वेगाने पसरल्याचा ठपका अग्निशमन दलाने पालिकेचे आयुक्त अजय मेहता यांना सादर केलेल्या आपल्या अहवालात ठेवला आहे़ या प्रकरणी आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रिज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विजक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेन्मेंट या कंपनीला जबाबदार धरण्यात आले असले, तरी त्यांच्यावर कारवाईबाबत मात्र, या अहवालात मौन बाळगण्यात आले आहे़‘मेक इन इंडिया’ सप्ताहांतर्गत ‘महाराष्ट्र रजनी’चा कार्यक्रम १४ फेब्रुवारी रोजी गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आला होता़ या सोहळ्यात नृत्याचा कार्यक्रम सुरू असताना, अचानक स्टेजखालून आगीचा भडका उडाला़ अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत, ही आग विझविली़ मात्र, यात कोट्यवधी रुपयांचे सामान जळून खाक झाले़ या आगीमागे षड्यंत्र असल्याचे अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याने, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले़ त्यानुसार, दहा दिवसांनी १४२ पानांचा अहवाल आज सादर झाला़१३ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचे फायर आॅडिट करताना, एल़पी़ गॅस सिलिंडर्सच्या वापरास लेखी मनाई करण्यात आली होती, याकडे अग्निमशन दलाने लक्ष वेधले आहे़, तसेच स्टेजजवळच मोठ्या प्रमाणात सिलिंडर्सचा साठा करण्यात आला होता़ एवढेच नव्हे, तर ज्वलनशील वस्तूंचा साठा स्टेजखाली केल्याने, या दुर्घटनेला आयोजकांनी आयते आमंत्रणच दिल्याचे, या अहवालातून अग्निशमन दलाने निदर्शनास आणले आहे़ (प्रतिनिधी)...अडचणी वाढत गेल्याअग्निशमन केंद्राचे अधिकारी व जवान साधनांसह हजर होते़ स्टेजला आग लागल्याचे दिसताच, त्यांनी मदतकार्यही सुरू केले़, परंतु तेथे असलेल्या अति ज्वलनशील वस्तूंच्या साठ्यामुळे आग वेगाने पसरत गेली़ यामुळे अग्निशमन दलाच्या अडचणी वाढल्या.आगप्रकरणात विझक्राफ्टला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. सरकारी निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. सर्व नियम धाब्यावर बसवत, चौपाटीवरील कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने सरकारच दोषी आहे.- संजय निरुपम, मुंबई अध्यक्ष, काँग्रेस