मुंबई : कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी दुपारी गॅस सिलिंडरची गळती होऊन लागलेल्या भीषण आगीत एका सिव्हिल इंजिनीअरसह सात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बळी गेला. या प्रकरणी व्ही.बी. नगर पोलीस ठाण्यात हॉटेलमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुर्ला कमानी नगरमधील ‘सिटी किनारा’ या चायनीज फूड सेंटरच्या तळमजल्यावर किचन, तर पहिल्या मजल्यावर ग्राहकांसाठी आसनव्यवस्था अशी रचना होती. पहिल्या मजल्यावरील दोन सिलिंडरपैकी एका सिलिंडरमधून दुपारी गळती सुरू झाली. त्या वेळी हॉटेलमध्ये आठ जण होती. त्याचवेळी शॉर्ट सर्किट झाल्याने सिलिंडरमधील गॅसने लगेच पेट घेतला. अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अवघ्या सात मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र यातून बाहेर निघण्यास मार्ग नसल्याने आगीत होरपळून हॉटेलमध्ये आलेल्या आठ जणांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)>बाहेर निघण्यास मार्ग नसल्याने या स्फोटात आठ जण जळून खाक झाले. मृतांना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका विद्या ठाकूर यांनी दिली. >मृतांमध्ये डॉन बॉस्को महाविद्यालयातील साजिद चौधरी, ब्रायन फर्नांडो, सार्जील शेख, ताहा शेख, आकाश थापर या इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या तरुणांसह बीएमएमची विद्यार्थिनी बर्मण्टो डिसुजा आणि अलीन डिसुजा यांचा समावेश आहे. >हॉटेलजवळील स्टर्लिंग कंपनीमध्ये काम करणारा अरविंद कनोजिया (३२) हाही बळी ठरला. आॅर्डर घेऊन खाली उतरल्यामुळे वेटर या अपघातातून बचावला, तर हॉटेलचालक शरद त्रिपाठी जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हॉटेलला आग; आठ जणांचा बळी
By admin | Published: October 17, 2015 3:26 AM