ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २ - भिवंडीतील महेश डाईंग कारखान्यामध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग भडकली होती. रात्री ३.३०च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाडया तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी सकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आता कुलिंगचे काम सुरु आहे. या अग्नितांडवात जिवीतहानी झाल्याचे वृत्त नसले तरी, वित्तहानी मात्र झाली आहे.
कारखान्यातील कच्चा माल आगीत जळून खाक झाला. आग नेमकी कशामुळे भडकली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाकडून आगीचे नेमके कारण तपासण्यात येईल.
Maharashtra: Fire broke out at a textile dying unit in Bhiwandi in early morning hours, fire fighting ops continue pic.twitter.com/m9skKM6wMb— ANI (@ANI_news) June 2, 2016