शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

कुलाब्यात मेट्रो हाऊस इमारतीला लागलेली आग भडकली

By admin | Published: June 02, 2016 4:58 PM

कुलाब्यातील रिगल थिएटरजवळच्या इमारतीला भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २ - दक्षिण मुंबईतल्या कुलाब्यातील रिगल थिएटरजवळ असलेल्या मेट्रो हाऊस इमारतीला लागलेली भीषण आग पुन्हा भडकली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १८ गाड्या आणि ११ टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, पाण्याचे टँकर न पोहोचल्यानं अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडचणी येत आहेत.

 सुदैवाने या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र तीन तास उलटूनही अजून आग धुमसतेच आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास ही आग लागली असून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कुलाब्यातील मेट्रो हाऊस परिसरातील रिगल सिनेमाजवळ ही इमारत आहे. तसेच, या परिसरातच प्रसिद्ध लिओपोल्ड कॅफे असून, त्याच्या बाजूलाच आमदार निवासही आहे.

मेट्रो हाऊस इमारत रिकामी करून नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी दोन अँम्बुलन्सही दाखल झाल्या आहेत. कुलाबा हा परिसर रहदारीचा असून, आगीनंतर इथली गर्दी आणखी वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी अतिदक्षतेचा उपाय म्हणून रिगल जवळ नाकाबंदी आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त केला आहे. 

दरम्यान, पाण्याअभावी आग विझविण्यास उशिर होत असल्याचा आरोप भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी केला आहे. आग विझविण्यासाठी फायर हायडृंटमधून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे.