शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
2
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
3
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
4
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
5
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
6
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
7
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
9
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
10
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
11
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
12
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
13
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
14
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
15
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
16
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
17
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
18
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
19
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
20
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम

वरळीत अग्नितांडव

By admin | Published: May 19, 2016 5:55 AM

वरळीतील मधुसुदन चाळीत बुधवारी सिलिंडरचा स्फोट होऊन १२ घरांतील सामान जळून खाक झाले.

मुंबई : वरळीतील मधुसुदन चाळीत बुधवारी सिलिंडरचा स्फोट होऊन १२ घरांतील सामान जळून खाक झाले. रहिवाशांच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली. आगीत लाखोंचा ऐवज खाक झाल्याने रहिवाशांना आर्थिक फटका बसला आहे. वरळी येथील पांडुरंग भुतकर मार्ग परिसरात १०० वर्षे जुनी एकमजली मधुसुदन चाळ आहे. बुधवारी सकाळी ११.३०च्या सुमारास येथील पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ८२ मधील गुलशन नट (५५) यांच्या घरात सिलिंडरचा मोठा आवाज आला. त्यांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना तेथून दूर होण्यास सांगितले. नट बाहेर पडणार, तोच आगीच्या संपर्कात येत सिलिंडरचा स्फोट झाला. रहिवासी इमारतीतून खाली उतरेपर्यंत एकामागोमाग एक असे तब्बल ५ ते ६ वेळा आवाज आले. या चाळीला लाकडी आधार असल्याने ही आग वेगाने पेट घेत होती. चाळीतील तरुणांनी खालच्या खोल्यांमधील सिलिंडर बाहेर काढले. त्यात विजेचा मेन स्विचही बंद करण्यात आला. त्यामुळे आग नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. १० ते १२ घरांमधील सामान आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली. आगीमुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. >...आणि तो वाचलागुलशन नट यांच्या घरात २५ जण एकत्र राहतात. नातेवाईकांचे लग्न असल्याने नट कुटुंबीय गावी होते. गुलशन त्यांचा सहा वर्षीय नातू आदिल सोबत घरात होते. घटनेच्या काही वेळापूर्वी आदिल खालच्या खोलीतील शुभांगी चांदणे यांच्या घरी गेला. तो खाली खेळत असताना अचानक मोठा आवाज झाला. चांदणे यांनी आदिलसोबत बाहेर पळ काढला. त्यामुळे तोही यातून बचावल्याचे चांदणे यांनी सांगितले. सिलिंडरची पळवापळवी : अग्नितांडवादरम्यान तरुणांनी जिवाची पर्वा न करता घरांमधील सिलिंडर बाहेर काढले. हे सिलिंडर दिसेल त्या मोकळ्या जागेत ठेवण्यात येत होते. मात्र, मदतीचा हात पुढे करण्याऐवजी मोकळ्या जागेत ठेवण्यात आलेले हे सिलिंडर पळवण्यात आले, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.