शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

अश्वांनी पूर्ण केल्या तीन फेºया अन् माऊलींच्या गजरानं दुमदुमला आसमंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:46 PM

माऊली पालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण : खुडूस फाटा येथे भक्तिमय वातावरण

ठळक मुद्देमाऊलींसह विठ्ठलाच्या भेटीला निघालेला वैष्णवांचा मेळा खुडूस येथे विसावा रिंगण सोहळा पार पडताच संपूर्ण मैदानात पुरुष व महिला वारकºयांनी फेर धरून फुगडीचा ठेका धरलालाखो वैष्णव पायी चालत ग्यानबा-तुकारामाचा गजर करीत पंढरीजवळ

एल. डी. वाघमोडे 

माळशिरस: अश्वांनी तीन फेºया मारल्यानंतर उपस्थित लाखो वैष्णवांनी माऊली माऊलींचा गजर करून आसमंत दणाणून सोडला़ माळशिरस येथील रात्रीचा मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज खुडूसच्या दिशेने निघाला़ सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी हा सोहळा खुडूस (ता. माळशिरस) हद्दीत पानीव पाटी येथे दाखल झाला़ या ठिकाणीच माऊलींचे जिल्ह्यातील दुसरे गोल रिंगण भक्तिमय वातावरणात पार पडले. 

यावेळी सरपंच वंदना ठवरे, माजी सरपंच मच्छिंद्र ठवरे, डॉ़ तुकाराम ठवरे , पंचायत समिती सदस्य अजय सकट, बाळासाहेब वावरे, डॉ़ केशव सरगर, बाळासाहेब सरगर, महादेव ठवरे, ज्ञानदेव लोखंडे आदींच्या हस्ते पालखी व अश्वांचे पूजन झाले़ त्यानंतर रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली.

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरा रिंगण सोहळा खुडूस येथील अभिजित वाघ, जयवंत सिद यांच्या शेतात पार पडला. अश्वांनी तीन फेºया मारल्या अन् भाविकांनी माऊली माऊलींच्या गजराने आसमंत दुमदुमून सोडला़ अश्वांनी गोल रिंगण फेरी पूर्ण करताच उपस्थित वारकºयांनी घोड्याच्या पायाखालची माती उचलून कपाळी लावण्यासाठी एकच धावपळ केली. त्यानंतर उडीचा खेळ, फुगडी अशा खेळांनी परिसराला चैतन्य निर्माण झाले.

माऊलींसह विठ्ठलाच्या भेटीला निघालेला वैष्णवांचा मेळा खुडूस येथे विसावा घेऊन वेळापूर मुक्कामासाठी रवाना झाला. हा रिंगण सोहळा पार पडताच संपूर्ण मैदानात पुरुष व महिला वारकºयांनी फेर धरून फुगडीचा ठेका धरला.

पंढरी आली समीप- आषाढी एकादशीला राज्यातून सर्व संतमहंतांच्या पालख्यांसह लाखो भाविक पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात़ यात सर्वात मोठा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आहे़ आता पंढरपूर ३५-४० किमी अंतरावर येऊन ठेपले आहे़ २५ जूनपासून मुक्काम दरमुक्काम करीत ऊन, वारा, पावसाच्या सरी झेलत, लाखो वैष्णव पायी चालत ग्यानबा-तुकारामाचा गजर करीत पंढरी जवळ करीत आहेत़ आता पंढरी जवळ आल्याची जाणीव भाविकांना होऊ लागली आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी