शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

पाठीमागून गोळीबार केला

By admin | Published: March 15, 2015 10:36 PM

उमा पानसरेंची माहिती : तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची केली पाहणी

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनास्थळाची पाहणी या प्रकरणातील एकमेव साक्षीदार उमा पानसरे व तपास अधिकारी अंकित गोयल यांनी रविवारी सकाळी केली. यावेळी गोयल यांनी ‘आई, तुम्हाला काही आठवतंय का?’ अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी हल्लेखोर पाठीमागून आले आणि साहेबांवर गोळीबार केला. त्यानंतर आपण बेशुद्ध पडल्याने पुढचे काही आठवत नसल्याचे सांगितले. गोयल यांनी सुमारे अर्धा तास त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. १६ फेब्रुवारीला सकाळी पानसरे दाम्पत्यावर गोळीबार झाला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेले अ‍ॅड. गोविंद पानसरे यांचा २० फेब्रुवारीला उपचार सुरु असताना मुंबईत मृत्यू झाला. या प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार त्यांच्या पत्नी उमा या रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतल्या आहेत. त्यांचा जबाबावर तपासाची दिशा ठरणार असल्याने तो घेण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत होते. दरम्यान, शनिवारी त्या थेट वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलल्याने पोलीस प्रशासनाची धांदल उडाली. अप्पर पोलीस अधीक्षक गोयल यांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास त्यांची घरी भेट घेतली. मारेकऱ्यांची रेखाचित्रे दाखविली असता त्यांनी त्यावर कोणतेच उत्तर दिले नाही. आपण हास्यक्लबमधून जाऊन आल्यानंतर हल्ला झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुमारे दीड तास ते त्यांच्याकडून माहिती घेत होते. त्यानंतर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुन्हा गोयल यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या घरापासून काही अंतरावरच हल्ला झाला, ते घटनास्थळ उमा पानसरे यांना दाखविण्यात आले. यावेळी त्यांना व्हीलचेअरवरून घटनास्थळी आणण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचे जावई बन्सी सातपुते, मुलगी स्मिता, सून मेघा, नातू कबीर व मल्हार, दिलीप पवार व मिलिंद यादव होते. यावेळी गोयल यांनी त्यांच्याकडून हल्ल्याची माहिती घेतली. (प्रतिनिधी) मोटारसायकलीबाबत विसंगत माहिती पानसरे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्प्लेंडर व पल्सर अशा दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. उमा पानसरे यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोघे मारेकरी बुलेटवरून आल्याचे सांगितल्याने पोलीस चक्रावले आहेत. रविवारी सकाळी जप्त केलेल्या स्प्लेंडर व पल्सर या दोन मोटारसायकली उमा पानसरे यांना दाखविण्यात आल्या. यावेळी त्यांनी मोटारसायकल नेमकी कोणती होती, हे आठवत नसल्याचे सांगितले.उमा पानसरे यांची भेट घेऊन त्यांना घटनास्थळ दाखविले असता त्यांनी हल्ला कसा झाला, याची थोडीफार माहिती दिली. अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही. आठवेल तशी त्या आम्हाला माहिती देत आहेत. टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडून याप्रकरणी संपूर्ण माहिती घेतली जाईल.- अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक