लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/ पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) संस्थेने उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्तेनुसार श्रेणी जाहीर केली. पहिल्या १०० विद्यापीठांत राज्याच्या १० विद्यापीठांना स्थान मिळाले आहे. पहिल्या १0 मध्ये ‘आयआयटी बॉम्बे’ला सर्वसाधारण गटातून चौथा तर विद्यापीठ गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास दहावा रँक आहे. मुंबई विद्यापीठाच्या रॅँकिंगमध्ये सुधारणा होऊन ते ८१ व्या स्थानावर आहे. सर्वसाधारण गटात आयआयटी मद्रास सर्वोत्कृष्ट ठरले. राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत नॅशनल रँकिंग जाहीर झाले.
राज्यातील इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (१५), भाभा इन्स्टिट्यूट (१७), टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स (३५), डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (४६), सिम्बायोसिस विद्यापीठ (५६), भारती विद्यापीठ (६२), डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (८५), डी.वाय. पाटील विद्यापीठ, मुंबई (८८) अशी रँक आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाला मागील वर्षी ५८.२४ गुण मिळाले होते. यंदा ते ५८.४० एवढे झाले आहेत. तरीही ते दहाव्या स्थानावर आले. मुंबई तसेच डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. फर्ग्युसन कॉलेजला २२ वे रँकिंग मिळाले, मागील वर्षी ते १९ होते. मेडिकलमध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठास २० वे, लॉमध्ये सिम्बायोसिस लॉ स्कूलला ७ वे, एमबीएमध्ये आयआयटी मुंबईला १० वे सिम्बायोसिसला २० वे, फार्मसी, मुंबईच्या आयसीटीला चौथे तर पूना कॉमर्सला १६ वे स्थान मिळाले आहे. नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूटला ३१ वे व सीओईपी पुणेला ४९ वे स्थान मिळाले आहे.असे होते निकषशिक्षण संस्थांमधील अध्यापन, अध्ययन व संसाधने, संशोधन व कार्यक्षमता, सर्वसमावेशकता, व्याप्ती व आकलन क्षमता आदी निकषांवर हे रँकिंग ठरविले आहे.