- नारायण जाधवठाणे : रेल्वे प्रवासात अचानक एखाद्या प्रवाशास हृदयविकाराचा झटका आल्यास वा गर्भवती महिलेस अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्यास किंवा इतर आजारांत तातडीची मदत म्हणून भारतीय रेल्वे देशभरातील सर्व स्थानके आणि प्रवासी गाड्यांमध्ये प्रथमोपचार पेटी व विविध प्रकारच्या ८८ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार आहे.प्रथमोपचार पेटीत सर्व प्रकारची औषधे उपलब्ध असतील. त्यामुळे प्रवाशांवर वेळीच उपचार होऊन त्यांचा जीव वाचविणे सोपे होईल. सर्व स्थानकांवर फोल्डिंग स्ट्रेचरही उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी रेल्वे गार्ड, टीसी व स्टेशन मास्तरांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.>‘या’ सुविधा देणारआॅक्सिजन सिलिंडर, प्रसूती किट, औषधे, कॅथेटर्स, लॅरिंगोंस्कोप (घसा तपासणी यंत्र), स्पिन्ल्ट्स (फ्रॅक्चर झाल्यास विशेष बँडेज), आॅक्सिजन डिफिब्रिलेटर्स (हृदयविकारासाठी) आदी वैद्यकीय उपकरणे, तसेच विविध लसी उपलब्ध असतील. सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एम्सच्या डॉक्टरांची एक समिती स्थापन केली आहे. ती आपत्कालीन परिस्थितीत लागणाऱ्या सेवांची पाहणी करणार आहे. समितीने औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची यादी केली आहे. आॅक्सिजन डिफिब्रिलेटर्सची किंमत तीन ते चार लाख रुपये आहे.>जनहित याचिकेनंतर हालचालीजयपूर-कोटा प्रवासात एका रेल्वे अधिकाºयाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे वृत्त वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्याआधारे दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीत स्थानिक न्यायालयानेही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी निर्देश दिले होते.>रेल्वेच्या १६२ लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये प्रथमोपचार पेटीची सुविधा आहे. त्यात ५८ औषधे असतात. प्रथमोपचार करून पुढील स्थानकावर डॉक्टर उपलब्ध होतात. आता सर्वच गाड्या व स्थानकांत विविध सेवा असतील.
रेल्वेमध्ये ८८ वैद्यकीय सेवा,गार्ड, टीसींसह स्थानक व्यवस्थापकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 6:27 AM