ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - डिसेंबर 2019 मध्ये नवी मुंबई विमानतळावरुन पहिलं विमान उड्डाण करेल याची खात्री मी देतो असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 'लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. सोबतच पुणे विमानतळाचा कायापालट करण्यात येणार असून लवकरच हे स्वप्न सत्यात उतरेल असंही सांगितलं आहे.
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पायाभूत सुविधांचा विकास कमीत कमी वेळात साधला जाऊ शकतो. यामुळे लोकांचं आयुष्य बदलेल. डिजिटल क्रांतीमुळे महाराष्ट्राचं रुप बदलेल. 2018 पर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात फायबर कनेक्विव्हिटी करण्यात येईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
"The first flight from Navi Mumbai airport will take off by Dec 2019" Hon'ble CM of Maharashtra @Dev_Fadnavispic.twitter.com/7jmhaSVnd1— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) September 13, 2016
स्त्यांचा दर्जा हा तुमच्या विकासाचा मार्ग असतो असं अटलजी सांगायचे. चांगले रस्ते संधी उपलब्ध करुन देतात. सध्या 6 लाख गावे एकमेकांना जोडली आहेत. पण पंतप्रधानांना प्रत्येक गावाला डिजिटलच्या माध्यमातून जोडायचे आहे. गेल्या 8 ते 10 वर्षापासून 8 मंजु-या अडकून होत्या, पण मोदींनी व्हिडिओमध्येच मंजुरी देऊन टाकली. 7 मंजु-या एका दिवसात आणि शेवटची सात दिवसांमध्ये, ही मोदींची काम करण्याची पद्दत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
Bright minds like @Dev_Fadnavis have come together to discuss our brighter future at #LokmatInfraConclavepic.twitter.com/eN5h575D3k— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) September 13, 2016
राज्यातील 10 हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प गेल्या 15 वर्षापासून प्रलंबित आहेत. पुढील 3 वर्षात हे प्रकल्प पुर्ण करणार आहोत यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सहमती दर्शवली आहे. वर्धा - यवतमाळ - नांदेडप्रमाणे अनेक प्रलंबित प्रकल्प होते. एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली. मात्र फंडिंग न मिळाल्याने प्रकल्प प्रलंबित राहिले. आता असं होणार नाही. आम्ही हे प्रकल्प पुर्ण करुन रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुर्गम भागांना जोडणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मुंबईतील हॉटेल ‘ग्रॅण्ड हयात’मध्ये या कॉनक्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. मान्यवरांचं स्वागत आणि कार्यक्रमाची रुपरेषा लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी मांडली. लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी कॉनक्लेव्हची संकल्पना विषद केली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं तर समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सर्व मान्यवरांचे आभार लोकमत समुहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मांडले.