शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
3
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
4
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
5
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
6
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
7
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
8
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
9
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
10
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
11
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
12
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
13
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
14
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
15
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
16
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
17
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
18
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
19
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
20
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!

आधी गुजरातचे तुकडे करा!

By admin | Published: April 09, 2016 4:03 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य राज्याचे चार तुकडे करा म्हणतात. कोण ते मागो वैद्य? काय मागू ते मिळेल काय, म्हणे महाराष्ट्राचे चार तुकडे करणार.

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य राज्याचे चार तुकडे करा म्हणतात. कोण ते मागो वैद्य? काय मागू ते मिळेल काय, म्हणे महाराष्ट्राचे चार तुकडे करणार. संघाने आधी गुजरातचे तुकडे करावेत, मग महाराष्ट्राचे बोलावे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संघाचा समाचार घेतला.गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज यांनी तब्बल ७ वर्षांनंतर शिवाजी पार्कवरील जाहीर सभा घेतली. एक तासाच्या भाषणात त्यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि एमएमआयएमच्या ओवैसी यांच्यावर सडकून टीका केली. राज्यात जाणीवपूर्वक विदर्भ आणि मराठवाडा वेगळा करण्याची भाषा केली जात आहे, असे सांगत सर्वाधिक काळ राज्यात आणि केंद्रात सत्ता भोगूनही विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांना त्यांच्या भागाचा विकास करता येत नसेल तर त्याचा दोष महाराष्ट्रावर कसा? इतका काळ सत्ता भोगूनही आपल्या भागाचा विकास करता येत नसेल तर खुर्च्या सोडा. पण तुमच्यासाठी महाराष्ट्र तोडू देणार नाही, असा इशाराही राज यांनी दिला. जे महाराष्ट्रात घडतेय तेच केंद्रात घडत आहे. मोदींनी गुजरातचा विकास केला म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण पंतप्रधान झाल्यापासून ते बदलून गेले. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्या मोदींनी केसाने गळा कापला, म्हणून आज मोदींवर टीका करीत आहे. सत्तेवर येताना भाजपाने ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखविली होती. आज काहीच घडत नसल्याने सत्ताधाऱ्यांचा नालायकपणा झाकण्यासाठी आरएसएसच्या आडून भावनिक मुद्दे उगाळले जात आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्या भाषणानंतर तीनवेळा ‘भारतमाता की जय’चा नारा द्यायच्या. भाजपा आणि संघाने देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटू नयेत, असा टोला राज यांनी लगावला.सोनारांच्या आंदोलनावर भाष्य करताना राज म्हणाले, विरोधात असताना हेच मोदी या अबकारी कराच्या विरोधात होते. ते म्हणाले होते की, हा कायदा आला तर सोनार आत्महत्या करतील. मग आता तोच कायदा का आणत आहात?देवेंद्र फडणवीस हे तर वर्गातील मॉनिटर आहेत. मुख्यमंत्री पदावरून काढले तरी भारतमाता की जय म्हणणार, असे ते म्हणाले. पण कोण काढतेय? काहीही बोलायचे! आधी राज्यात ज्या वाईट गोष्टी चालल्यात त्या बंद करा, असा टोला राज यांनी हाणला. गळ्यावर सुरा ठेवला तरी ‘भारतमाता की जय’ बोलणार नसल्याची भाषा ओवैसी करतो. इकडे महाराष्ट्रात ये फिरवून दाखवितो, असे म्हणत राज यांनी ओवैसींना लक्ष्य केले. भाजपाच्या पैशावर ओवैसींचा सारा कारभार चालू आहे, असा आरोपही राज यांनी केला.मनसेवर आंदोलन अर्धवट सोडण्याचा आरोप होतो. मराठी पाट्या, मराठी सिनेमे, रेल्वेतील मराठी टक्का आणि टोलसारखे आंदोलन मनसेने सत्ता नसतानाही यशस्वी केले. आंदोलन अर्धवट सोडल्याचा आरोप करणाऱ्यांनी राम मंदिर आंदोलनाचा खुलासा करावा.शिवसेनेच्या जैतापूर आंदोलनाचे काय झाले? असे विचारत शिवसेनेच्या भूमिकेचाही समाचार घेतला. सत्तेत राहायचे आणि रुसूबाई.. रुसूबाई करायचे. पटत नसेल तर सत्तेतून बाहेर व्हा. पण सत्ताही उबवायची आणि कोंबडेही खायचे, असा हा प्रकार आहे.