पुणे : अंगणवाडीतील विद्यार्थी खासगी शाळेत जाण्यापासून रोखण्यासाठी व जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला असून, १ मार्चपासूनच पहिलीचे वर्ग सुरू केले आहेत. बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौैलत देसाई यांच्या हस्ते हवेलीतील साडेसतरा नळी येथील शाळेत या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कृतियुक्त ज्ञानरचनावादचे धडे व आयएसओ शाळा या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शाळांचा दर्जा वाढला असून, गेल्या वर्षी पुणे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी गळती रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आले होते. ५५६ इतका पट वाढविण्यात यश मिळाले होते. यात सर्वाधिक शिरूर तालुक्यात १ हजार १0२ व हवेली तालुक्याने १ हजार ४६ इतका पट वाढला होता. यावर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी दौैलत देसाई यांनी गेल्या आठवड्यात सर्व तालुक्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यांची बैैठक घेवून १ मार्चपासून पहिलेचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले होते. खासगी शाळेतील पहिलीचे प्रवेश हे डिसेंबर, जानेवारीत होतात. जिल्हा परिषद शाळा मात्र सुरू होण्यास जून महिना उजाडतो. त्याचा सर्वाधिक फटका हा जिल्हा परिषद शाळांना बसून पटसंख्या घटते. तसेच इतर शाळांत जाणाऱ्या मुलांच्या पालकांपर्र्यत पोहचून त्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्यात प्रबांधन करण्यात येईल. आंगणवाडीची पाच ते सहा वयोगटाील मुलं व इतर मलांना जर आंम्ही वेळेत प्रवेश देवू शकलो तर त्याचा पटसंख्या वाढीवर नक्कीच चांगला परिणाम होईल. तसेच जून पर्र्यत या मुलांना शाळेची गोडी लागेल, त्यामुळे यावर्षी पहिलेचे वर्ग हे १ मार्चपासूनच सुल करण्याचे ठरविले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौैलत देसाई यांनी सांगितले. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व माननीय पदाधिकारी, अधिकारी, शालेय पातळीवरील सर्व समितीतील अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामस्थ, पालक, शिक्षकप्रेमी, महिला, युवकवर्ग यांना सहभागी करून घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. हवेलीला होणार फायदाहवेली तालुका हा पुणे शहरालगतचा असून खासगी शाळांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे येथील पालक आपल्या पाल्याला खासगी शाळेत घालण्याकडे प्रयत्नशील असतात. मात्र प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांचा दर्जाही खासगी शाळांसारखा होत आहे. मात्र आपल्या शाळा या उशिरा सुरू होतात. तोपर्यंत पालक आपल्या पाल्यांना खासगी शाळेत दाखल करतात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना मोठा फटका बसतो. यामुळे हवेली तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा परिषदेचे पहिलीचे वर्ग १ मार्चपासूनच सुरू करण्यात आले आहेत. >हवेलीतील पहिलीची पटसंख्या२०१५-१६ मुले :२७६७मुली :२६०२एकूण :५३६९२०१६-१७ मुले :२७७८मुली :२७२०एकूण :५५०५>दरवर्षी जिल्हा परिषद शाळेत येणाऱ्या मलांची संख्या घटते, याला मुख्य कारण म्हणजे आंम्ही खासगी शाळेप्रमाणे लवकर प्रवेश देत नाही. त्यामुळे हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. याचा नक्कीच पटसंख्यावाढीवर परिणाम होईल.- दौैलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
पहिलीचे वर्ग आजपासूनच सुरू
By admin | Published: March 02, 2017 1:24 AM