कळंब : तालुक्यातील इटकूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत बारा गावातील ५ हजार २४२ शेतकऱ्यांचा ७ कोटी ९७ लाख रुपयांचा पीक विमा जमा झाला असून, या ठिकाणी सभासद संख्या जास्त असल्याने गावाच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून क्रमवारीप्रमाणे सोमवारपासून विम्याचे वाटप सुरू झाले आहे. असे असले तरी पहिल्याच दिवशी मागणीच्या तुलनेत अल्प चलन पुरवठा झाल्याने घोडकी येथील असंख्य शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.कळंब तालुक्यातील इटकूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेंतर्गत ईटकूर, कोठाळवाडी, आडसूळवाडी, गंभिरवाडी, भोगजी, बहूला, आढळा, आथर्डी, पाथर्डी, पिंपळगाव को, घोडकी, बोरगाव धनेश्वरी आदी गावांचा समावेश आहे. यागावातील पाच हजार २४२ शेतकऱ्यांनी गतवर्षी खरीप हंगामात राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत ५४ लाख रूपयांचा विमा हप्ता भरला होता. यानुसार शाखेअंतर्गत तब्बल आठ कोटींचा पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे. बँक शाखे अंतर्गत गावांची व लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने सोमवारी ईटकूर शाखेत सर्व गावातील प्रमुख लोकांच्या उपस्थितीत गावाच्या नावाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यानुसार प्रत्येक गावाला दोन दिवस निर्धारित करण्यात आले आहेत. रोटेशनप्रमाणे सोमवारी प्रत्यक्षात रक्क़म वाटपास सुरूवात करण्यात आली आहे. (वार्ताहर)
पहिल्याच दिवशी चलन तुटवड्याचा फटका
By admin | Published: June 13, 2016 11:33 PM