नाशिक : बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान वृषभदेव महाराज यांच्या १०८ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान त्याची प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळा होणार आहे. संपूर्ण विश्वात एकाच पाषाणात कोरलेली १०८ फुटी भगवान वृषभदेव महाराज यांची ही एकमेव मूर्ती आहे. कर्नाटकातील श्रवणबेल्लुगूर येथे भगवान बाहुबली यांची ५७ फुटी पूर्णाकृती मूर्ती आजवर सर्वांत उंच मानली जात होती. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील मांगी डोंगरावर ही भव्य मूर्तीसाकारताना असंख्य अडचणीव कठीण प्रसंगांना सामोरे जात, शेकडो कामगारांनी हे आव्हानपेलले. सलग तेरा वर्षे सुरू असलेलेहे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मांगीतुंगीचा डोंगर पूर्णत: ‘बेसॉल्ट’ पाषाणाचा आहे. देशात एकूण १,४५० विविध लेणीअसून, एकट्या महाराष्ट्रात१,१५० लेणी आहेत व त्याप्रामुख्याने बेसॉल्ट दगडातच कोरल्या गेल्या आहेत. अजिंठा-वेरूळ लेण्यांमध्येही हाच दगड आढळतो. (प्रतिनिधी)असे घडविले पूर्णाकृती शिल्पजमिनीपासून सुमारे ४५ हजार फूट उंचीवरील ज्या डोंगरावर वृषभदेव महाराजांचे शिल्प कोरण्यात आले आहे, तो डोंगर चढून जाण्यासाठी वन खात्याच्या हद्दीतील पायवाटेने जावे लागते. शिल्प साकारण्याचे काम जयपूरच्या सूरजकुमार नाहटा यांनी केले आहे. अगोदर त्यांनी हस्तिनापूर येथे नऊ फुटी दगडाची मूर्ती तयार केली, त्यानंतर १०८ फुटी मूर्तीचे चित्र कापडावर रेखाटले व नंतर प्रत्यक्षात काम सुरू झाले.प्रत्यक्षात मूर्ती १०८ फुटी असली तरी तिचा चबुतरा आणि पाच फुटी कमळ पाहाता, मूर्तीची उंची १२३ फुटांपर्यंत पोहोचते. त्यात डोक्याचे केस ५ फूट, मुख १२ फूट, मान ४ फूट, कान १४ फूट, मान ते वक्षस्थळ १२ फूट, वक्षस्थळ ते नाभी १२ फूट, नाभी ते गुढगे ३६ फूट, गुढगे ४ फूट, गुढगे ते घोटे २९ फूट, तळपाय ४ फूट, कमळ ५ फूट आणि चबुतरा ३ फूट असे आहे.१९९६ मध्ये ज्ञानमती माताजी यांनी मांगीतुंगी येथे भगवान वृषभदेव महाराजांची मूर्ती साकारण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांनंतर वन खात्याने तत्त्वत: मान्यता दिली व २००२ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते शीलापूजन करण्यात आले. तब्बल तेरा वर्षांनंतर ही मूर्ती पूर्णत्वास आली असून, फेब्रुवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच देशभरातून २० लाख भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पहिले तीर्थंकर वृषभदेव यांचे भव्य पूर्णाकृती शिल्प
By admin | Published: December 20, 2015 12:38 AM