कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटकचे लक्ष लागून राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शनिवारी होणा:या जयसिंगपूर येथील 13व्या ऊस परिषदेत यंदाच्या हंगामातील पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे.
खा. राजू शेट्टी विनाकपात प्रतिटन 3 हजारांची मागणी करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी शेट्टी यांनी प्रतिटन 3 हजारांची मागणी केली होती. त्यावरून महिनाभर आंदोलन सुरू होते. अखेर कारखानदारांशी चर्चा करून 2,65क् रुपयांवर तडजोड झाली.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ‘स्वाभिमानी’तील बिनीच्या शिलेदारांनी संघटनेशी फारकत घेतली आहे. त्याचे
पडसाद उमटणार, हे निश्चित आहे.
या पाश्र्वभूमीवर संघटनेचे
कार्यकर्ते ऊस परिषदेत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
च्वेतनवाढीचा करार आणि कल्याणकारी महामंडळ स्थापन होईर्पयत तोडणी सुरू केली जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने शुक्रवारी दिला. जिल्ह्यातील कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
च्2क्14-15 चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच नवीन करार करण्यासाठी जून 2क्14मध्ये मागण्यांचे निवेदन आणि संपाची नोटीस दिली होती; परंतु सरकार व राज्य साखर संघाने कार्यवाही न केल्याचे डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले.