तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीसाठी तळेगाव शहर भारतीय जनता पक्ष, तळेगाव शहर जनसेवा विकास समिती व आरपीआय (आठवले गट) युतीकडून २६ पैकी १४ जागांवरील उमेदवारांची पहिली अधिकृत यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीतील १४ जणांत सात महिला उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आघाडी घेतल्याने युतीच्या उमेदवारांना प्रचार करण्यास अधिक वेळ मिळणार आहे. पहिल्या यादीत भाजपाच्या १०, जनसेवा विकास समितीच्या तीन, तर आरपीआयच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, विरोधी पक्षनेते सुनील शेळके, नगरसेवक सुशील सैंदाणे या विद्यमान नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांना प्रभाग क्रमांक १०मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिवंगत सचिन शेळके यांचे बंधू संदीप शेळके यांना स्टेशन भागातील प्रभाग क्रमांक १ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या उमेदवारांच्या यादीवर जनसेवा विकास समितीचे संस्थापक बाळासाहेब काकडे, भाजपाचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे, कार्याध्यक्ष रवींद्र आवारे, तळेगाव शहर आरपीआयचे (आठवले गट) अध्यक्ष संजय सोनवणे, जनसेवा विकास समितीचे निमंत्रक चंद्रभान खळदे यांची स्वाक्षरी आहे. (वार्ताहर)>प्रभाग क्र. १ : अ) सर्वसाधारण महिला - कल्पना सुरेश भोपळे (भाजप), ब) सर्वसाधारण - संदीप बाळासाहेब शेळके (भाजप),प्रभाग क्र. २ : अ) इतर मागासवर्ग - सुशील ज्ञानेश्वर सैंदाणे (भाजप), ब) सर्वसाधारण महिला - विभावरी रवींद्रनाथ दाभाडे ( भाजप), प्रभाग क्र. ३ : अ) अनुसूचित जाती महिला - अनिता अनिल पवार (आरपीआय), ब) सर्वसाधारण - संग्राम बाळासाहेब काकडे (जनसेवा विकास समिती),प्रभाग क्र. ४ : ब) सर्वसाधारण महिला - सुलोचना गंगाराम आवारे (जनसेवा विकास समिती),प्रभाग क्र. ५ : अ) इतर मागास वर्ग - संतोष आनंदा शिंदे ( भाजप), ब) सर्वसाधारण महिला -नीता अशोक काळोखे (भाजप)प्रभाग क्र. ६ : ब ) सर्वसाधारण महिला - हेमलता चंद्रभान खळदे (जनसेवा विकास समिती) ,प्रभाग क्र.७ : अ) इतर मागासवर्ग महिला - काजल प्रदीप गटे (भाजप), ब) सर्वसाधारण - सुनील शंकर शेळके(भाजप),प्र. क्र. ९ : अ) अनु. जाती - संदीप सुरेश चव्हाण (भाजप)प्रभाग क्र. १० : ब) सर्वसाधारण - संतोष हरिभाऊ दाभाडे (भाजप).
भाजपा मित्र पक्षांची पहिली यादी
By admin | Published: November 05, 2016 1:34 AM