मुंबई : दूरचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी, ज्यांना शाखा किंवा विषय बदलाचा आहे असे विद्यार्थी, यांच्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष फेरीची पहिली आॅनलाईन गुणवत्ता यादी गुरूवारी रात्री उशीरा जाहीर झाली. या यादीत ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळाला असून उरलेल्या ७ हजार ६६७ विद्यार्थ्यांना दुसऱ्या विशेष फेरीसाठी अर्ज करावा लागणार आहे. विशेष गुणवत्ता यादीत अर्ज केलेल्या ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ६६७ विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही. याउलट ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलाची संधी मिळाली आहे. मात्र केवळ ४० हजार ३२६ विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. याउलट उरलेल्या १९ हजार ६३४ विद्यार्थ्यांना पसंतीक्रमातील पहिल्या तीन महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही. दुसऱ्या विशेष फेरीत सुमारे २५ हजारांहून अधिक विद्यार्थी अर्ज करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीत सर्व विद्यार्थ्यांना नव्याने लॉगीन आयडी व पासवर्ड घ्यावा लागणार आहे. पुन्हा प्रवेश अर्ज व पसंतीक्रम अर्ज भरावा लागणार आहे. पहिल्या फेरीत अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने लॉगीन आयडी व पासवर्ड घेऊन अर्ज करता येईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)यादीला उशीर, विद्यार्थ्यांचा संतापअकरावीच्या पहिल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत दूरचे महाविद्यालय मिळाल्याने अनेक विद्यार्थी नाराज झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रशासनाला आॅनलाईनच्या तीन विशेष फेऱ्या घ्याव्या लागत आहेत. मात्र पहिल्याच विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात प्रशासनाला उशीर झाला. सायंकाळी पाच वाजता जाहीर होणारी गुणवत्ता यादी रात्री नऊ वाजेपर्यंत जाहीर झाली नव्हती. परिणामी विद्यार्थ्यांसह पालकांच्या संतापात भर पडली.एकूण प्रवेश अर्ज - ६७ हजार ६२७प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी - ५९ हजार ९६०प्रवेशापासून वंचित विद्यार्थी - ७ हजार ६६७पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी - २७ हजार ३८७दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी - ७ हजार ९०४तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी - ५ हजार ०३५
अकरावीच्या पहिल्या यादीत ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना प्रवेश
By admin | Published: August 12, 2016 4:42 AM