ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसह ज्या विद्यार्थ्यांना शाखा किंवा विषय बदल करायचा आहे, त्यांच्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष फेरीची पहिली आॅनलाईन गुणवत्ता यादी गुरूवारी रात्री उशीराजाहीर झाली. या यादीत ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळालाअसून उरलेल्या ७ हजार ६६७ विद्यार्थ्यांना दुसºया विशेष फेरीसाठी अर्जकरावा लागणार आहे.विशेष गुणवत्ता यादीत अर्ज केलेल्या ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांपैकी ७हजार ६६७ विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही.याउलट ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलाची संधी मिळाली आहे.मात्र केवळ ४० हजार ३२६ विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीच्यामहाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. याउलट उरलेल्या १९ हजार ६३४विद्यार्थ्यांना पसंतीक्रमातील पहिल्या तीन महाविद्यालयात प्रवेशमिळालेला नाही. त्यामुळे दुसºया विशेष फेरीत सुमारे २५ हजारांहून अधिकविद्यार्थी अर्ज करण्याची शक्यता आहे.दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या विशेष फेरीत प्रवेश मिळाला आहे,त्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन शुक्रवार व शनिवारदरम्यान प्रवेशनिश्चित करायचा आहे. नाही तर हा प्रवेश रद्द होईल. महत्त्वाची बाब म्हणजेविशेष गुणवत्ता यादीतील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनायाआधीच्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करावा लागेल. शिवाय ज्याविद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नाही, त्यांना इतरविद्यार्थ्यांप्रमाणे दुसºया विशेष फेरीसाठी अर्ज करता येईल, अशी माहितीशिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली.दुसºया विशेष प्रवेश फेरीत सामील होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनानव्याने लॉगीन आयडी व पासवर्ड घ्यावा लागणार आहे. शिवाय पुन्हा एकदाप्रवेश अर्ज व पसंतीक्रम अर्ज भरावा लागणार आहे. पहिल्या फेरीत अर्धवटअर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीसाठी नव्याने लॉगीन आयडी वपासवर्ड घेऊन अर्ज करता येईल. लवकरच दुसºया विशेष प्रवेश फेरीचेवेळापत्रक जाहीर केले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.एकूण प्रवेश अर्ज - ६७ हजार ६२७प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी - ५९ हजार ९६०प्रवेशापासून वंचित विद्यार्थी - ७ हजार ६६७पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी २७ हजार ३८७दुसºया पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी - ७ हजार ९०४तिसºया पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी - ५ हजार ०३५शाखानिहाय प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या -कला ४ हजार ७८२वाणिज्य ३८ हजार ७३२विज्ञान १६ हजार ४४६
यादीला उशीर, विद्यार्थ्यांचा संतापअकरावीच्या पहिल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत दूरचे महाविद्यालयमिळाल्याने अनेक विद्यार्थी नाराज झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचीनाराजी दूर करण्यासाठी प्रशासनाला आॅनलाईनच्या तीन विशेष फेºया घ्याव्यालागत आहेत. मात्र पहिल्याच विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यातप्रशासनाला उशीर झाला. सायंकाळी पाच वाजता जाहीर होणारी गुणवत्ता यादीरात्री नऊ वाजेपर्यंत जाहीर झाली नव्हती. परिणामी विद्यार्थ्यांसहपालकांच्या संतापात भर पडली.