काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 06:03 AM2024-10-25T06:03:49+5:302024-10-25T06:04:27+5:30
विद्यमान पाच आमदारांचा समावेश नाही
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इतर पक्षांच्या तुलनेत सर्वात शेवटी आपली पहिली ४८ जणांची उमेदवारयादी गुरुवारी रात्री जाहीर केली. या यादीत विद्यमान आमदारांसह काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपमधून प्रवेश केलेल्या दोन जणांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. या यादीत २५ विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
यादीमध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले मंत्री राजेंद्र गावीत यांना शहादामधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना धारावीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाची पहिली यादी
- नाना पटोले साकोली प्रदेशाध्यक्ष
- बाळासाहेब थोरात संगमनेर विद्यमान आमदार
- विजय वड्डेटीवार ब्रह्मपुरी विरोधी पक्षनेते
- पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण विद्यमान आमदार
- मुझ्झफर हुसेन मीरा भाईंदर माजी आमदार
- अस्लम शेख मालाड पश्चिम विद्यमान आमदार
- नसीम खान चांदीवली माजी आमदार
- ज्योती गायकवाड धारावी खासदार बहीण
- अमिन पटेल मुंबादेवी विद्यमान आमदार
- अमित देशमुख लातूर शहर विद्यमान आमदार
- विश्वजित कदम पलुस-कडेगाव विद्यमान आमदार
- धीरज देशमुख लातूर ग्रामीण विद्यमान आमदार
- के. सी पाडवी अकलकुवा विद्यमान आमदार
- राजेंद्रकुमार गावित शहादा भाजपमधून प्रवेश
- किरण तडवी नंदुरबार नवीन चेहरा
- शिरीषकुमार नाईक नवापूर विद्यमान आमदार
- प्रवीण चौरे साक्री नवीन चेहरा
- कुणाल पाटील धुळे ग्रामीण विद्यमान आमदार
- ॲड. धनंजय चौधरी रावेर माजी आमदार पुत्र
- राजेश एकडे मलकापूर विद्यमान आमदार
- राहुल बोंद्रे चिखली माजी आमदार
- अमित झनक रिसोड आमदार
- प्रा. विरेंद्र जगताप धामणगाव रेल्वे माजी आमदार
- डॉ. सुनील देशमुख अमरावती भाजपमधून प्रवेश
- ॲड. यशोमती ठाकूर तिवसा विद्यमान आमदार
- बबलुभाऊ देशमुख अचलपूर
- रणजित कांबळे देवळी विद्यमान आमदार
- प्रफुल गुडधे नागपूर दक्षिण पश्चिम
- बंटी शेळके नागपूर मध्य
- विकास ठाकरे नागपूर पश्चिम विद्यमान आमदार
- डॉ. नितीन राऊत नागपूर उत्तर विद्यमान आमदार
- गोपालदास अगरवाल गोंदिया माजी आमदार
- सुभाष धोत्रे राजूरा विद्यमान आमदार
- सतीश वारुजकर चिमूर
- माधवराव पाटील हदगाव विद्यमान आमदार
- तिरुपती कोंडेकर भोकर नवीन चेहरा
- मीनल पाटील खतगावकर नायगाव
- सुरेश वरपुडकर पाथरी विद्यमान आमदार
- विकास औताडे फुलंब्री
- संजय जगताप पुरंदर विद्यमान आमदार
- संग्राम थोपटे भोर विद्यमान आमदार
- रवींद्र धंगेकर कसबा पेठ विद्यमान आमदार
- प्रभावती घोगरे शिर्डी नवीन चेहरा
- सिद्धराम मेहत्रे अक्कलकोट माजी आमदार
- ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण विद्यमान आमदार
- राहुल पाटील करवीर माजी आमदार पुत्र
- राजू आवळे हातकणंगले विद्यमान आमदार
- विक्रमसिंह सावंत जत विद्यमान आमदार