शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

पुण्यात भरणार शिक्षकांची पहिली 'राष्ट्रीय काँग्रेस'

By admin | Published: July 05, 2016 8:43 PM

शैक्षणिक प्रश्नांवर उहापोह करण्यासाठी देशात पहिल्यांदाच नॅशनल टीचर्स काँग्रेस २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

मुंबई : शैक्षणिक प्रश्नांवर उहापोह करण्यासाठी देशात पहिल्यांदाच नॅशनल टीचर्स काँग्रेस २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे.पुण्यातील कोथरूड येथील माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट (मिटसॉग)महाविद्यालयाच्या प्रांगणात ही परिषद पार पडेल, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम यांनी दिली. या परिषदेला देशातील विविध विभागांत शिकवणारे सुमारे ८ हजार शिक्षक येण्याची शक्यता निकम यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. निकम म्हणाले की, या परिषदेचे आयोजन महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), मनुष्यबळ विकास मंत्रालय, भारत सरकार, असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययु), भारतीय छात्र संसदफाऊंडेशन, महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल फेडरेशन व विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणेचे युनेस्को अध्यासन, हॉर्वर्ड बिझनेस स्कूल क्लब आॅफ इंडिया या संस्थांच्या सहकार्यातून केले आहे. देशातील पदवी आणि पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमांचे ८ हजार शिक्षक यामध्ये सामील होणार आहेत.शिक्षणाचा दर्जा वाढवणे, शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण देणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अधिकाधिक आर्थिक तरतूद करणे, शिवाय तरतूदीप्रमाणे आर्थिक खर्च करणे अशा विविध विषयांवर सखोल चर्चा परिषदेत होईल. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे राष्ट्रीय परिषदेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी आहेत. तर डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भाटकर अशी तज्ज्ञ मंडळी अनुक्रमे चेअरमन आणि कार्याध्यक्षपदी विराजमान आहेत. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन शिक्षकांना मिळेल. तीन दिवसीय परिषदेत सात सत्रे पार पडणार आहेत. त्यामध्ये शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, कला, पत्रकारिता या क्षेत्रांतील व्यक्ती मार्गदर्शन करतील.

देशात उत्तम संशोधक, संवेदनशील, समाजाभिमुख, प्रगतीशील, दिशादर्शक, प्रेरणादायी आणितत्त्वनिष्ठ शिक्षकांची फळी निर्माण करण्याचे परिषदेचे उद्दीष्ट आहे..............................टीचर टू टीचर कनेक्टपरिषदेत ६०शिक्षकांचा गट तयार करून ह्यटीचर टू टीचर कनेक्ट हा उपक्रम राबविला जाईल. ज्यामध्ये एकाच विषयावर सर्व शिक्षक आपापली मते मांडतील. त्यानंतर संबंधित विषयाचे सार काढून उपस्थित प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी ५० वर्षांहून कमी वयोगटातील शिक्षकांनी या परिषदेत सामील होण्याची आवाहन आयोजकांनी केले आहे.या विषयांवर होणार चर्चा- भारतीय शिक्षण पद्धतीचा इतिहास, सद्यस्थिती आणि भवितव्य- सध्याच्या शिक्षण पद्धतीत भारतीय मूल्यांचा समावेश आहे का?- कॉर्पोरेट सीएसआर तसे शिक्षणासाठी टीएसआर- आपण शिकवितो; ते शिकतात का?- शिक्षणस्तर सुधारण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडतेय का?- शिक्षक : मार्गदर्शक, प्रेरक, प्रोत्साहक आपण अवलोकन करतो का?- शिक्षणावरील खर्च अल्प नाही का?.....................दिग्गज वक्त्यांची उपस्थितीयाशिवाय कार्यक्रमात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय मंत्रीस्मृती इराणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे,अभिनेता आमिर खान, सुपर ३०चे जनक आनंद कुमार असे दिग्गज वक्ते मार्गदर्शनकरणार आहेत.