अहमदनगर : केडगाव उपनगरात शनिवारी दोघा शिवसैनिकांची हत्या केल्यानंतर संदीप गुंजाळ उर्फ डोळसे याने तोफखाना पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संजयकुमार सोने यांना फोन करत गुन्ह्याची कबुली दिली़ ‘मी दोघांना मारले असून, मला अटक व्हायचे आहे. पण मला भीती वाटत असल्याने पोलीस संरक्षण हवे आहे’ असे सांगत पारनेर पोलिसांत हजर होणार असल्याची माहिती त्याने दिली होती, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले़शर्मा म्हणाले, केडगाव येथे शिवसेनेचे उप शहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या केल्यानंतर गुंजाळ याने सोने यांना फोन करून गुन्हाची कबुली दिली़ सोने यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना हत्याकांडाच्या तपासात राजकीय दबाव नाही़ सोशल मीडियावर या संदर्भात कुणी खोटी माहिती प्रसारित केली तर कारवाई करण्यात येईल़ या घटनेत ज्यांच्या विरोधात पुरावे मिळतील त्यांना सोडणार नाही़ केडगाव हत्याकांड, तेथील तोडफोड व अधीक्षक कार्यालयावरील हल्ला अशा तीन घटनांचा एकाचवेळी तपास सुरू आहे़ केडगाव येथे घटनास्थळी हत्या करताना गुंजाळ याच्यासोबत चार ते पाच जण असल्याचा अंदाज आहे़ यामध्ये ज्यांची नावे समोर आली अशा आठ ते दहा जणांची चौकशी सुरू आहे़ येत्या पाच ते सहा दिवसांत या घटनेचा उलगडा होईल असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला़हत्या कारताना गुंजाळ याच्यासोबत असलेल्या पाच जणांची नावे निष्पन्न झाली असून, यातील एकाला मंगळवारी नगर तालुक्यात ताब्यात घेतले. तर बुधवारी यातील आणखी काही जणांना अटक केल्याचे समजते़केडगाव येथे शिवसेना पदाधिकाºयांच्या हत्येनंतर शनिवारी (दि़७) रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते़ यावेळी अधीक्षक कार्यालयावर जमावाने हल्ला करून जगताप यांना आमदार कर्डिले यांच्या वाहनातून पळवून नेले होते़ याप्रकरणी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे़ सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी अटक केलेल्यांना दाखविले तेव्हा त्यांनी ४९ जणांची नावे निष्पन्न केली़>फरार जगतापांचा शोध सुरूआमदार अरूण जगताप यांच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह अधीक्षक कार्यालयातील तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल असल्याने त्यांचा शोध सुरू आहे़ लवकर त्यांनाही अटक केली जाईल़ मयत कोतकर व ठुबे यांच्या नातेवाईकांना पोलीस संरक्षण दिल्याचे शर्मा यांनी सांगितले़>राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह पदाधिकारी रडारवरनेत्याच्या प्रेमाखातर अधीक्षक कार्यालयात तोडफोड करणे राष्ट्रवादीचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडले असून, ज्यांची नावे निष्पन्न झाली त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे़ या प्रकरणी आतापर्यंत ४० जणांना अटक करण्यात आली असून आणखी ४९ नावे निष्पन्न झाली आहे.यामध्ये आमदार अरूण जगताप, नगरसेविका शीतल जगताप यांच्यासह पाच नगरसेवकांचाही समावेश आहे़ या गुन्ह्यात मंगळवारी अटक करण्यात आलेल्या अलका मुंदडा, अवधूत जाधव, संजय गाडे, धनंजय गाडे, अंकुश मोहिते, नगरसेवक फैय्याज शेख, एजाज ख्वाजा सय्यद उर्फ एजाज चिची यांना बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते़
आरोपीनेच दिली पहिली खबर, शिवसैनिक हत्येच्या तपासात राजकीय दबाव नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 5:11 AM