शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

पहिल्या टप्प्यात दूध, भाजीपाला बंद करणार

By admin | Published: May 14, 2017 4:53 AM

१ जूनपासून जाहीर केलेल्या शेतकरी संपाच्या पहिल्या टप्प्यात दूध, भाजीपाला बंद करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणतांबा (जि.अहमदनगर) : १ जूनपासून जाहीर केलेल्या शेतकरी संपाच्या पहिल्या टप्प्यात दूध, भाजीपाला बंद करण्यात येणार आहे. शनिवारी पुणतांब्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण राज्यात हे आंदोलन करण्यात येणार आहे. ३ एप्रिलला पुणतांबा (ता. राहाता) येथील विशेष ग्रामसभेत १ जूनच्या शेतकरी संपाचा निर्णय घेण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाचे लोण संपूर्ण राज्यात पसरले. शनिवारी येथील काशी विश्वेश्वर मंदिरात पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची बैठक धनंजय धोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.‘मी शेतकरी संपावर जाणार’ असे घोषवाक्य तयार करण्यात आले. शिर्डी-संगमनेर राज्यमार्गावर दूध, भाजीपाल्याच्या गाड्या अडवून सरकारला आंदोलनाची दखल घेण्यासाठी आक्रमक पद्धतीने भाग पाडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी एकाच दिवशी राज्यभरात शेतकऱ्यांनी कुटुंबासह रेल्वे रोको करण्याचेही ठरले. बैठकीस माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. धनंजय धनवटे, शिर्डीचे विजय कोते, पंकज लोढा, चंद्रकांत तुरंगे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. बैठकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.