ऑनलाइन लोकमत
रायगड, दि. 6 - अलिबाग आणि एकूणच रायगड जिल्ह्यातील कला, संस्कृती आणि सांस्कृतिक कलाविष्कारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच नाट्य रसिकांसाठी मराठीतील नामवंत आणि दर्जेदार नाटकांची मेजवानी मिळावी यासाठी अलिबागमध्ये अत्याधुनिक नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे. पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाने यासाठी पुढाकार घेत उभारलेल्या नाट्यगृहाचे आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून दिनांक ७ जुलै २०१७ रोजी सकाळी १० वाजता अलिबाग येथील चेंढरे – बायपास या ठिकाणी सोहळा संपन्न होणार आहे.
महाराष्ट्राला नाट्यगृह, नाटकं आणि वेगवेगळ्या कलाविष्कारांची, सादरीकरणाची परंपरा आहे. तीच परंपरा रायगड जिल्ह्यातही जपली जात आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र, जिल्ह्यात अत्याधुनिक नाट्यगृहाची कमतरता होती. ही कमतरता भरून काढण्यासाठी पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाने अलिबाग शहरात अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त, देखणे नाट्यगृह बांधण्याची मोहीम हाती घेतली आणि ती आता पुर्णत्वास आणली आहे. या नाट्यगृहाचे लोकार्पण ७ जुलै रोजी विशेष मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून या नाट्यगृहातील व्यासपीठाला ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. नानासाहेब लिमये यांचे नाव देण्यात आले आहे.
आणखी वाचा
अलिबाग शहरातील नाट्यरसिकांसाठी आमदार जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीतून त्याचबरोबर नृपाल पाटील आणि चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे, या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या नाट्यगृहात स्टेट ऑफ दी आर्ट पद्धतीच्या नऊशे आसनांची बसण्याची व्यवस्था असून नाट्यगृहात जपानच्या टीओए ऑडीयो सिस्टीम्सची व्यवस्था करण्यात आली आहे. उच्च गुणवत्तेच्या आवाजासाठी उत्तम ऑकॉस्टीकल डीफ्युजर्स असून जास्त चांगल्या सादरीकरणासाठी पहिले लाईट - वेट व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सभागृहात जास्त आरामदायी वातावरणासाठी केंद्रीभूत एसी व्यवस्था. कलाकारांसाठी पूर्णपणे सुसज्ज स्टेट ऑफ द आर्ट ग्रीन रुम्स. दुर्मिळ डॉक्युमेंटरीज्साठी व्हिडीयो प्रोजेक्शनची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑकॉस्टीकली ट्रीटेड क्राय रुम्स. टॉप ऑफ द लाईन फायरफायटींग इक्युपमेंटस्. नाटकांच्या तालमींसाठी खुल्या अॅम्फी थीएटरची व्यवस्था. पर्यावरणाच्या दृष्टीने ग्रीनलिफ विद्युत प्रणालीची उत्पादने. श्रोत्यांच्या सोयीसाठी उपहारगृह. ऑनलाईन तिकीट बुकींगची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या अत्याधुनिक पीएनपी नाट्यगृहात नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबरच, संगीत, नृत्य आणि गायनाचे वर्ग घेण्यासाठी सुद्धा व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्यामुळे रायगड जिल्ह्यात सांस्कृतिक चळवळीला एक वेगळी वाटचाल मिळेल. या नाट्यगृहात पहिला कार्यक्रम करण्याचा मान अशोक हांडे यांच्या " मराठी बाणा " या दर्जेदार मराठी कार्यक्रमाला मिळाला आहे शनिवार दिनांक 8 जुलै सायंकाळी 7 वाजता
" मराठी बाणा " च्या प्रयोगाने ह्या नाट्यगृहाचे उदघाटन होत आहे
अशोक हांडे यांचा लोकमत "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्काराने सन्मान
मराठी भाषेचा अभिमान मराठी बाण्याने सांगणारे अवलिया कलावंत अशोक हांडे यांना यंदाच्या परफॉरमिंग आर्ट (Performing Arts) विभागातील "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. विधान परिषदेचे विरोधी नेते धनंजय मुंडे, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि भरत दाभोळकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या विभागात निरंजन भाकरे, पूजा गायतोंडे, सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर (महाराज, सप्त खंजिरीवादक कीर्तनकार , अकोला), सुभाष नकाशे(कोरियोग्राफर) यानांही नामांकित करण्यात आले होते. मात्र, जनतेनं अशोक हांडे यांच्या नावाला पसंती दिली आहे.