श्रावणातील मंगळागौर पूजन व त्यानिमित्त होणाऱ्या खेळात पारंपरिक गाणी म्हटली जातात. त्या चालीवर आम्हाला काही नवी गाणी सुचली...
बॉलीवूड ‘क्वीन'ला उद्देशून ‘राजस सुकुमार’
पोरी पिंगा गं, पोरी पिंगा गं, पोरी पिंगा गं, पोरी पिंगा..!
ट्विटच्या पिंग्यानं तुझ्या सतावलं, रात जागवली पोरी पिंगा !
ट्विट करतेस गं, ब्रेकिंग होते गंखेळ तुझा गं, पोरी पिंगा
तुझ्या पिंग्याची 'दिशा' भलतीच गंवाजवे ‘कंगना’ तू, पोरी पिंगा !
खेळतो पेंग्विनशी, नाही जिवाशी‘नाइटलाइफ’लाच घालतो पिंगा
तू ‘राणी झाशीची’ सोड मला गं‘सैनिक’ नवखा मी, पोरी पिंगा
पोरी पिंगा गं, पोरी पिंगा गं, पोरी पिंगा गं, पोरी पिंगा !
----------
माजी ‘सीएम’बाईंना उद्देशून
फू बाई फू फुगडी फू‘अमृता’ ट्विट-ट्विट करतेस तू
ट्विट बाई, ट्विट सारखं ट्विटपतिदेवांना तू आणतेस वीट
घुमू दे ट्विटर घुमू दे खेळात जीव ह्यो रमू दे
गडनी ट्विटर फुकतिया, 'देवेंद्रा'चं सिंहासन हलतंया
नाचून-गाऊन बाई दमू दे, ‘देवेंद्रा’ला दुसरं काही सुचू देत्याच्या सोयीचं ट्विटर घुमू दे !
------------
'महाविकास आघाडी'ताईला उद्देशून
नाच गं घुमा, कशी मी नाचू ?
ह्या गावचा, त्या गावचा कोरोना न्हाई गेला‘अनलॉक’ न्हाई झाला, कशी मी नाचू ?
नाच गं घुमा ! ह्या गावचा, त्या गावचा बाजार ठप्प झालापैसा न्हाई आला, कशी मी नाचू ?
नाच गं घुमा !
ह्या गावचा, त्या गावचा ‘रेडझोन’ न्हाई गेलाह्यो पाऊस आला मेला, कशी मी नाचू ?
नाच गं घुमा !
------
‘देवेंद्र’ थकतो, ‘चंदूदादा’ हात मळतो 'जाणता राजा' बघा झिम्मा खेळतो.
झिम ‘कमळे’ झिम, खुर्चीभोवती झिम‘संजय’ मारतो नेम अन् ‘उद्धव’ करतो धूम‘दादा’च्या नादी लागून खुर्ची झाली गूमझिम ‘कमळे’ झिम, खुर्चीभोवती झिम
----------आम जनतेचे गाणे
एक लॉकडाऊन झेलू बाईदोन लॉकडाऊन झेलूदोन लॉकडाऊन झेलू बाईतीन लॉकडाऊन झेलूतीन लॉकडाऊन झेलू बाईचार लॉकडाऊन झेलूचार लॉकडाऊन झेलू बाई पाच लॉकडाऊन झेलू...-----------
अभय नरहर जोशी
abhayjoshi27@gmail.com (लेखक लोकमतच्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)