शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण?
3
महायुती-महाविकास आघाडीत ‘काँटे की टक्कर’; भाजपाला सर्वाधिक आघाडी, मनसेची स्थिती काय?
4
Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यातील कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर, केदार दिघे पिछाडीवर…
5
कोकणात राणे बंधुंपैकी एक आघाडीवर, एक पिछाडीवर; सिंधुदूर्गचा कल कोणाकडे....
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत खल्लास! टीम इंडियाला मिळाली अल्प आघाडी
7
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights :भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं
8
Maharashtra Assembly Election 2024 Result Kandivali Vidhansabha : कांदिवली पूर्वेतून भाजपचे अतुल भातखळकर आघाडीवर, विजयाची हॅटट्रिक मारणार का?
9
शेअर बाजारात ५ महिन्यांचा उच्चांक; गुंतवणूकदारांनी ७.१५ लाख कोटी कमावले
10
अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर
11
झारखंडमध्ये एनडीए आणि ‘इंडिया’त टफफाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय असं चित्र
12
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर दक्षिणमध्ये मोठी घडामोड, अमल महाडिक २०१२ मतांनी आघाडीवर; कोण मारणार बाजी ?
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 बविआला राडा भोवणार! नालासोपाऱ्यात भाजपाचा उमेदवार आघाडीवर, क्षितिज ठाकूरांचा गेम होणार? 
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
16
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : Video - "पुन्हा एकदा..."; निकालाच्या दिवशी नेतेमंडळी सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक
18
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
19
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
20
व्हॉट्सॲप ग्रुपवरून ज्ञान, घरीच केली प्रसूती; चेन्नईतील खळबळजनक घटना

पुण्यात यंदाच्या हंगामात मंगळवारी प्रथमच तापमान ४० पार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 8:37 PM

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात वाढ

ठळक मुद्देमे महिन्यात रस्तोरस्ती असलेली शीतपेयांची दुकाने, आईस्क्रिम पॉर्लर, रसवंतीगृहे सध्या बंद विदर्भात ६ मे रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसगार्मुळे शहरात उन्हाळ्याची चर्चा जणू थांबली आहे. मंगळवारी शहरातील कमाल तापमानाने यंदाच्या हंगामात प्रथमच चाळीशी पार केली आहे. मंगळवारी शहरातील तापमान ४०.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत २६ अंश सेल्सिअसने अधिक आहे. लोहगाव येथे ४१.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून ते सरासरीपेक्षा ३४ अंश सेल्सिअसने अधिक आहे.लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील गर्दी अजूनही तुरळक आहे. मे महिन्यात रस्तोरस्ती असलेली शीतपेयांची दुकाने, आईस्क्रिम पॉर्लर, रसवंतीगृहे सध्या बंद आहेत. त्यामुळे सूर्य आग ओकत असला तरी रस्त्यावर त्याचा दिसणारा प्रभाव लोकघरात असल्याने दिसून येत नाही. लोकही घरात असल्याने बाहेर सूर्याचा दाह किती प्रखर आहे, याची जाणीव होताना दिसत नाही. त्याचवेळी रात्रीचे तापमान हे राज्यात सर्वात कमी १९.५ अंश सेल्सिअस पुण्यात नोंदले गेले. त्यामुळे भर मे महिन्यात रात्र आल्हाददायक ठरत आहे.मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पुणे शहरातील कमाल तापमान प्रामुख्याने एक ते दोन दिवस ४० अंशाच्या पुढे जाते. काही वर्षी ते ४१अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.१० व ११ मे रोजी कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवसकिमान तापमानात वाढ होऊन ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

......................

* विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता..मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. पुढील दोन दिवसात कोकण, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात मंगळवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४४.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १९.५ अंश सेल्सिअस होते़ मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत वाढले आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी आज सरासरीच्या तुलनेत १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ झालीआहे........................................

*इशारा :

विदर्भात ६ मे रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

७ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडाटासह पावसाची शक्यता असून कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.८ मे रोजी विदर्भात वादळी वाºयासह पावसाची शक्यता असून मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.९ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाºयासह गारपीट होण्याची शक्यताआहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यताआहे.......राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

पुणे ४०.३, लोहगाव ४१.४, जळगाव ४३.६, कोल्हापूर ३९.५, महाबळेश्वर ३४.१, मालेगाव ४२.२, नाशिक३९.८, सोलापूर ४३.२, मुंबई ३४, सांताक्रुझ ३४.३, अलिबाग ३२.८, रत्नागिरी३४.५, पणजी ३४.८, डहाणु ३३.८, औरंगाबाद ४१.६, परभणी ४३.५, नांदेड ४३,अकोला ४४.९, अमरावती ४३.४, बुलढाणा ४०.८, ब्रम्हपूरी ४४, चंद्रपूर ४४,गोेंदिया ४०.२, नागपूर ४२.४, वाशिम ४३.....सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात ८ व ९ मे रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोलापूरला ९ मे रोजी पावसाची शक्यता आहे.  विदर्भात जवळपास सर्व जिल्ह्यात ७ ते ९ मे दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे. 

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानSummer Specialसमर स्पेशलRainपाऊस