रत्नागिरी : कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसतानाच रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे़. डेल्टा प्लसचा संसर्ग झालेल्या संगमेश्वर तालुक्यातील ८० वर्षीय महिलेवर रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते़ उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे. डेल्टा प्लस या विषाणूचा हा पहिलाच बळी असून, या महिलेला अन्य आजारही असल्याचे सांगण्यात येत आहे.राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी येत असली तरी डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे़ महाराष्ट्रातील डेल्टा प्लस व्हेरियंटने संक्रमित २१ रुग्ण आढळले आहेत़ त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ९, जळगावमध्ये ७, मुंबईमध्ये २ तर पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गातील प्रत्येकी १ डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले होते.या नव्या व्हेरियंटने संक्रमित झालेल्या ८० वर्षीय रूग्णाचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे़ या रुग्णाला अन्यही काही आजार होते, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे़ हा रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील असल्याचे पुढे आले आहे़ या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते़ दरम्यान, डेल्टा प्लसची लागण झालेल्या रुग्णांनी लस घेतली होती का? तसेच त्यांचा प्रवासाचा इतिहास तपासला जाणार आहे.
डेल्टा प्लसचा राज्यातील पहिला बळी रत्नागिरी जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 6:16 PM
CoronaVirus DeltaPlus Ratnagiri : कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसतानाच रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे़.
ठळक मुद्देडेल्टा प्लसचा राज्यातील पहिला बळी रत्नागिरी जिल्ह्यातसंगमेश्वरातील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू