अकोला : गत दोन दिवसांपासून अकोल्यात तापमानने उच्चाक गाठला आहे. तापमानाचा पारा ४७ अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. अशातच बुधवारी उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली. किसन कीनेकर असे या व्यक्ती चे नाव आहे. ते बाळापूर तालुक्यातील मोरगाव सादीजन येथील रहिवासी आहेत. उष्माघाताचा हा राज्यातील पहिला बळी असावा , असे जाणकारांचे मत आहे. जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे तापमानाचा पारा ही वाढतो आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ४७ डिग्रीवर पोहोचले आहे. अशातच बुधवारी सर्वोपचार रुग्णालयात उष्माघाताचा पहिला रुग्ण दाखल ज़ाला होता. हा बाळापुर तालुक्यातील मोरगाव (सादिजन) येथील ४० वर्षीय रहिवासी होता. उपचारदरम्यान त्याचा मृत्यु ज़ाल्याची माहिती समोर आली आहे.
उष्माघाताचा राज्यातील पहिला बळी अकोल्यात; ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 2:22 PM