मुंबई - मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आयात - निर्यातमधील वित्तीय तूट या चार महिन्यात १०० अब्ज डॉलर झाली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
एकीकडे वाढती महागाई, बेरोजगारी आणि बेरोजगारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घटणारे मूल्य या सर्वांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार नाही ना अशाप्रकारची भीती नागरीक आणि तज्ज्ञांना वाटू लागली आहे असेही महेश तपासे म्हणाले.
सध्याची परिस्थिती अर्थव्यवस्थेसाठी चांगली नाही त्यामुळे आपली परकीय गंगाजळी कमी होईल. सध्याच्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी विरोधी पक्षातील अनुभवी लोकांना बोलावून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मार्गदर्शन घ्यावे व सकारात्मक मार्ग काढून मात करावी अशी विनंतीही महेश तपासे यांनी केली आहे.