शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

मच्छीमारांनाही हवी आता शेतकऱ्यांप्रमाणे कर्जमाफी

By admin | Published: June 21, 2017 4:06 AM

शेतकऱ्यांप्रमाणेच कर्जात बुडालेल्या मच्छीमारांनाही कर्जमाफी देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकऱ्यांप्रमाणेच कर्जात बुडालेल्या मच्छीमारांनाही कर्जमाफी देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे. यासंदर्भात बुधवारी, २१ जूनला रोजी मस्त्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासोबत कृती समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच्या एका महिन्यात ठोस निर्णय झाला नाही, तर जुलै महिन्यात गिरगाव चौपाटीवरून मंत्रालयपर्यंत लाँग मार्च काढण्याचा इशारा समितीने दिला आहे. मंगळवारी पत्रकार भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत समितीने ही माहिती दिली.समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल म्हणाले की, मच्छीमारांना कर्जमाफी देण्यात सरकार सकारात्मक दिसत आहे. तरीही सरकारने वेळकाढूपणा करू नये. राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेतून बर्फ कारखाने, शीतगृहे व यांत्रिक नौकांसाठी घेतलेले कर्ज सरकारने माफ करावे, अशी कृती समितीची मागणी आहे. २९ मार्च २००८ रोजी मच्छीमारांच्या थकीत कर्जमाफीचा मसुदा मस्त्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाने शासनाला सादर केलेला आहे. त्यात शासनाने एनसीडीसीमार्फत मच्छीमारांकडे १९७७ सालापूर्वी थकीत असलेल्या १ कोटी ७१ लाख ६८ हजार रुपयांचे जुने कर्ज आणि त्यावरील ६५ लाख ५२ हजार रुपयांचे व्याज असे एकूण २ कोटी ३७ लाख २० हजार रुपये कर्ज माफ करण्याची नोंद आहे. शिवाय १९७७ ते ३१ मार्च २००७ सालापर्यंत एनसीडीसीमार्फत मच्छीमारांकडे ११६ कोटी ०९ लाख १२ हजार रुपयांचे थकीत कर्ज आहे. या कर्जासोबत १२ कोटी ६० लाख १३ हजार रुपयांची थकीत व्याजाची रक्कम मिळून एकूण १२८ कोटी ६९ लाख २५ हजार रुपये कर्जमाफी देण्याचा प्रस्ताव सचिवांकडे प्रस्तावित आहे.याआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर मच्छीमारांसाठीही कर्जमाफी जाहीर झाली होती. मात्र शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी मिळत आहे. याउलट मच्छीमार मात्र जुन्याच कर्जांच्या ओझ्याखाली दबत आहेत. सध्या राज्यात मस्त्यदुष्काळ पडला असून, मच्छीमारांची स्थिती बिकट आहे. त्यात महसूल खात्याकडून जुन्या कर्जांच्या वसुलीसाठी मच्छीमारांच्या बोटींसह घरांवरही जप्तीची प्रक्रिया सुरू आहे. पुढील पाच वर्षांत हा व्यवसायच नामशेष होण्याची भीती समितीला आहे़सरकारने महिन्याभरात मच्छीमारांना कर्जमाफी दिली नाही, तर सागरी जिल्ह्यांत आंदोलन पेट घेईल, अशी माहिती तांडेल यांनी दिली. ते म्हणाले की, मच्छीमारी व्यवसाय चालणाऱ्या मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर जुलै महिन्यात मोर्चे काढून मच्छीमार जेलभरो आंदोलन करतील. त्यानंतरही शासनाने लक्ष दिले नाही, तर २७ जुलैला ५० हजार मच्छीमारांचा राज्यव्यापी लाँग मार्च मंत्रालयावर धडक देईल.