ऑनलाइन लोकमत
मीरा रोड (ठाणे), दि. २४ - पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाठिकाणी निषेध करण्यासाठी निघलेले अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक बर्नड डिमेलो यांच्यासह 5 मच्छीमारांना उत्तन सागरी पोलिसांनी उत्तन नाका येथून ताब्यात घेतले. स्मारकासाठी समुद्रात ४२ एकरात होणाऱ्या भरावामुळे मसेमारी वर मोठा विपरीत परिणाम होऊन मच्छीमार उध्वस्त होण्याची भीती मच्छीमारांनी व्यक्त केली.
सुरवातीला अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती व महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने निषेध करण्याचा निर्णय घेतला होता. पण मच्छीमार संघटनां मध्ये फूट पाडण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने विरोध करण्याचा निर्णय मागे घेतला. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने मात्र विरोध करण्याचा पावित्रा कायम ठेवला.