शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

खारघर येथे पत्रकारावर हल्ल्याप्रकरणी पाच अटकेत

By admin | Published: April 03, 2017 2:43 AM

खारघर येथे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

नवी मुंबई : खारघर येथे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यात भाजपा आमदाराच्या चुलत भावाचाही समावेश असून सोसायटीच्या वादातून त्यांनी हल्ला केल्याचे उघड झाले आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्हीमधून गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा उलगडा केला आहे.शुक्रवारी खारघर येथे पत्रकार सुधीर सूर्यवंशी व त्यांचे मित्र संतोष फतारे यांच्यावर हल्ल्याची घटना घडली होती. अज्ञात चौघांनी त्यांची अडवणूक करून जबर मारहाण केली होती. मारेकऱ्यांनी तोंडावर रुमाल बांधलेले असल्यामुळे त्यांची ओळख पटलेली नव्हती. दरम्यान, सूर्यवंशी यांनी काही जणांवर संशयदेखील व्यक्त केला होता, परंतु पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले असता हल्ल्यात त्यांचा समावेश नसल्याचे समोर आले. त्यामुळे या हल्ल्यामागे नेमका हात कोणाचा, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. त्याकरिता आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त दिलीप सावंत, सहायक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी व कक्ष दोनचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासादरम्यान सूर्यवंशी राहत असलेल्या कल्पतरू सोसायटी ते घटनास्थळ दरम्यानचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले असता, काही जण त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यात दिसले. त्यापैकी एका बॉडीबिल्डरचे छायाचित्र काढून पोलिसांनी पनवेलमधील जिममध्ये चौकशी केली असता, मारेकऱ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार घटनेच्या चोवीस तासांच्या आत पोलिसांनी एकाला पेणमधून तर चौघांना लोणावळा येथून अटक केली. मयूर कृष्णा ठाकूर (३0), आकाश कृष्णा पाटील (२४), अशोक जगन्नाथ भोईर (३0), विश्वास आत्माराम कथारा (३0), अनंता तुकाराम कथारा (२६) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी मयूर हा भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांचा चुलत भाऊ आहे, परंतु या हल्ल्यामागे राजकीय कारण नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मयूर हा सूर्यवंशी यांचा शेजारी असून त्यांच्यात सतत भांडण होत होते. काही दिवसांपूर्वी सोसायटीमध्ये भाजपाची पत्रके वाटताना सूर्यवंशी यांनी विरोध केल्यानेदेखील त्यांच्यात वाद झाला होता. याच कारणातून त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा सूर्यवंशी यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)