आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : राज्यात सहकार खात्याकडून गोरगरिबांसाठी अल्पदरात वैद्यकीय सेवा देणारी सहकारी रुग्णालये उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून, पहिल्या टप्प्यात ५ जिल्ह्यात ही रुग्णालये उभारण्याचा प्रस्ताव आहे़, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. गोरगरिबांना अल्पदरात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार खात्याकडून पाच जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर रुग्णालय उभारण्याची प्राथमिक तयारी सुरू आहे़ उस्मानाबाद, कोल्हापूर, नांदेड या तीन जिल्ह्यात बैठका घेण्यात आल्या़ विविध सामाजिक संस्था, व्यक्ती यांच्या पुढाकाराने सहकारी रुग्णालयाची नोंदणी झाली आहे़ अहमदनगर, औरंगाबाद येथील प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे़ समाजातील दानशूर सेवाभावी व्यक्ती, सहकारी संस्था आणि धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून ही रुग्णालये चालवण्याची सहकार खात्याची योजना आहे़ राज्यात अश्विनी सहकारी रुग्णालय, सोलापूर, हिरेमठ सहकारी रुग्णालय, बार्शी, सुश्रुषा को-आॅप़ हॉस्पिटल, मुंबई अशी ३ रुग्णालये सध्या सहकारी तत्त्वावर चालवली जात आहेत़ याच धर्तीवर राज्याच्या अनेक भागात सहकारी तत्त्वावर रुग्णालय उभारण्याची कल्पना मंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्या सहकार खात्यामार्फत राबवण्याची योजना हाती घेतली आहे़ ----------------------अशी असतील रूग्णालयेसहकारी रुग्णालयात सामान्य व्यक्तींना भाग भांडवल घेऊन सभासद होता येईल़ रुग्णालयाच्या व्यवस्थापनात सभासद आणि डॉक्टर मंडळी यांचा सक्रिय सहभाग असेल़ माफक दरात गोरगरिबांना, सभासदांना वैद्यकीय सेवा देण्यात येईल़ सहकारी तत्त्वावर या रुग्णालयाची नोंदणी करण्यात येणार असून संस्थेची घटना, नियमावली बनवली जाणार आहे़------------------------निधीची तरतूद...सभासद भागभांडवल शासकीय भागभांडवलआर्थिक वर्षाअखेर सहकारी संस्थांच्या निव्वळ नफ्यात २० टक्के पर्यंत धर्मादाय निधीची तरतूद करून रुग्णालयांना देणगी स्वरुपात. खासगी कंपन्यांना त्यांच्या ‘सीएसआर’फंडामधून खर्च करण्यासाठी आवाहन करणाऱ -------------------सोलापुरात आयोजित के लेल्या महाआरोग्य शिबिरात ३० हजारांहून अधिक रुग्ण आले़ त्यात बहुसंख्य गरीब होते़ सरकारी रुग्णालयात सेवा मिळत नाही आणि खासगी रुग्णालयाचे दर परवडत नाहीत़ त्यामुळे गरिबांना परवडणारी वैद्यकीय सेवा सहकारी रुग्णालयातून मिळावी हा हेतू समोर ठेवून काम हाती घेतले आहे़ - सुभाष देशमुखमंत्री, सहकार व पणन
राज्यात पाच सहकारी रुग्णालय उभारणार, सुभाष देशमुख यांची माहिती
By admin | Published: April 03, 2017 2:31 PM