मुंबई: राष्ट्रवादीत गेलेल्या शिवसेना नगरसेवकांची घरवापसी होणार आहे. गेल्याच आठवड्यात अहमदनगरच्या पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेले होते. त्याबद्दल शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन करून नगरसेवकांना परत पाठवा, असा निरोप दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर कामाला लागले. त्यांच्या मुत्सद्देगिरीला यश आलं आहे. राष्ट्रवादीत गेलेले पाच नगरसेवक स्वगृही परतणार आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला. त्यामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसला. महाविकास आघडीतील समन्वयावरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला. अजित पवारांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा प्रवेश झाल्यानं ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. आमचे नगरसेवक परत पाठवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक आता माघारी परतणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्या भेटीत नगरसेवकांच्या घरवापसीचा निर्णय झाला. यावेळी पाचही नगरसेवक उपस्थित होते. हे नगरसेवक मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पारनेरमधील फोडाफोडीच्या राजकारणावर पडदा पडणार आहे.पारनेरमध्ये झालेलं राजकारण, मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होते. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मातोश्रीवरून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचा संपर्क करून देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीत गेलेल्या नगरसेवकांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्यानं शरद पवार यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं दिसतं आहे.शिवसेनेला राष्ट्रवादीचा 'दे धक्का'; निवडणुकीच्या तोंडावरच पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडले!"रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादीकडे भीक मागताहेत"'मातोश्री'तून थेट 'बारामती'ला फोन; "आमचे नगरसेवक परत पाठवा!"
राष्ट्रवादीत गेलेल्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांची होणार घरवापसी; मुख्यमंत्र्यांच्या खास माणसाची यशस्वी मध्यस्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 2:28 PM