लाभ : बँकांना मिळाले 3,500 कोटी
मुंबई : बँकांना पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत 25 सप्टेंबर्पयत 5 कोटीहून अधिक खाती उघडली आहेत. या खात्यांमध्ये जमा रकमेच्या माध्यमातून बँकांना 3,5क्क् कोटी रुपये मिळाले आहेत.
वित्तीय सेवा सचिव जी. एस. संधू यांनी भारत-अमेरिका चेंबरच्या वार्षिक बैठकीदरम्यान ही माहिती दिली. सार्वजनिक क्षेत्रतील बँकांच्या नेतृत्वाखाली वित्तीय संस्थांनी 25 सप्टेंबर्पयत जनधन योजनेंतर्गत 5 कोटीहून अधिक बँक खाती सुरू करण्यात आली आणि एकूण 3,5क्क् कोटी रुपयांहून अधिक डिपॉङिाट प्राप्त झाले. या योजनेच्या माध्यमातून उघडण्यात आलेल्या खात्यांमध्ये प्रतिखाते सरासरी 8क्क् ते 9क्क् रुपये जमा केले जातात. योजना सुरू झाल्या दिवशी बँकांनी 1.5 कोटीहून अधिक खाती उघडली होती. सरकारने येत्या प्रजासत्ताक दिनार्पयत कोणत्याही रकमेशिवाय 7.5 कोटी खाती उघडण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या खात्यांसोबतच 5,क्क्क् रुपयांची ओव्हर ड्राफ्ट सुविधा व एक लाख रुपयांच्या अपघात विम्याची सुरक्षितता प्रदान केली आहे. तसेच ही खाती रुपे कार्डशी जोडली आहेत. आधार कार्डशी संबंधित सर्व सबसिडी योजना राबविणो जोपे जावे यासाठी ही योजना सुरू केली आहे. (प्रतिनिधी)
आधार योजनेसाठी
आधार योजनेला गती देण्यात येत असून या खात्यांना आधारशी संलग्न करण्यात आले आहे.
बनावटगिरीपासून वाचण्यासाठी यामध्ये बायोमेट्रिक सुरक्षा उपायांचा वापर करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी जनधन योजनेची घोषणा केली होती. गेल्या 28 ऑगस्ट रोजी या योजनेस औपचारिक प्रारंभ झाला.