शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

आरोपीच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ

By admin | Published: July 23, 2016 4:16 AM

कोपर्डी (ता. कर्जत) अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे याच्या पोलीस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली

अहमदनगर : कोपर्डी (ता. कर्जत) अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे याच्या पोलीस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. उर्वरित दोन आरोपींचीही सोमवारी कोठडी संपणार आहे़ सरकारी वकील सतीश पाटील यांनी आरोपीला सात दिवसांची कोठडी मिळण्याची मागणी केली़ कोपर्डी येथील घटना गंभीर असून, हे प्रकरण अतिशय संवेदनशील बनल्याने पोलिसांना सर्व बाजूने तपास करून पुरावे एकत्र करावे लागत आहेत़ घटना कुठे घडली, कशी घडली, आरोपी कुठे लपला होता या सर्व बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे़ वातावरण संवेदनशील असल्याने आरोपीला घटनास्थळासह इतर ठिकाणी घेऊन जाणे शक्य नाही़ त्यामुळे पुढील तपासासाठी आरोपीला कोठडी मिळावी, असा युक्तीवाद अ‍ॅड़ पाटील यांनी केला़ शनिवारी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले कोपर्डीत येणार आहेत़ शुक्रवारी भैय्यूजी महाराज व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी गावाला भेट दिली. भैय्यूजी महाराजांनी विद्यार्थीनींसाठी सीसीटीव्ही असलेल्या अद्ययावत दोन मिनी स्कूल बस दिल्या. हजारे व त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. भय्यूजी महाराज संस्थान प्रणित सूर्योदय परिवारातर्फे सूर्योदय कुहू कन्याधन योजनेतून विद्यार्थिनींसाठी हजारे यांच्या हस्ते दोन बस ग्रामस्थांकडे सोपविण्यात आल्या. या मोफत बससेवेसाठी महिला वाहक असेल. (प्रतिनिधी)